Wednesday, March 8, 2017

‘फक्त मराठी’ वाहिनी करणार ‘सलाम स्त्री शक्ती’ला



‘फक्त मराठी’ वाहिनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण चित्रपटांचे सादरीकरण करीत असते. याच पार्श्वभूमीवर ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘फक्त मराठी’ वाहिनीने वैविध्यपूर्ण स्त्रीप्रधान चित्रपट रसिकांच्या भेटीस आणले आहेत. ‘फक्त मराठी’ वाहिनीवर येत्या ४ मार्च ते १० मार्च दरम्यान दुपारी २:३० वा.‘सलाम स्त्री शक्ती’ विशेष चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

यामध्ये प्रेक्षकांना ‘मोहिनी’, ‘हिरवा चुडा’, ‘पोलिसाची बायको’, ‘सत्यमेव जयते’, ‘आईच्चा गोंधळ’, ‘सख्खा सावत्र’, ‘सवतीचं कुंकू’ या सात स्त्रीप्रधान चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. स्त्री व्यक्तिरेखांचे विविध कंगोरे या चित्रपटांमधून बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आजवर‘फक्त मराठी’ वाहिनीने सादर केलेल्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून पसंती दर्शविली असून ‘सलाम स्त्री शक्ती’ मधील चित्रपटांना देखील रसिकांची पसंती लाभेल. 

No comments:

Post a Comment