नवे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करत आहेत. असाच एक वेगळा जाणीव संपन्न मनोरंजक सिनेमा घेऊन दिग्दर्शक अमोल शेटगे, अभिनेत्री राजश्री लांडगे, कॅमेरामन सुरेश देशमाने हे मराठी चित्रपटसृष्टीतील तीनजण एकत्र आले आहेत. १६ ऑक्टोबरला ‘सिटीझन’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
कृष्णराज फिल्म्स बॅनर प्रस्तुत अमोल शेटगे, राजश्री लांडगे, सुरेश देशमाने निर्मित ‘सिटीझन’ हा एक युथबेस सिनेमा आहे. आजच्या तरूणाईचा आवाज सिटीझन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक फ्रेश चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत.
हा विषय चित्रपटातून मांडणं गरजेचं असल्यामुळेच अमोल शेटगे, राजश्री लांडगे, सुरेश देशमाने या तिघांनी एकमताने या चित्रपटाच्या निर्मिती करिता पुढाकार घेतला. यावर एक उत्कृष्ट चित्रपट होऊ शकतो असं आमचं मत होतं. त्यामुळे या प्रकल्पात आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून सामील होतो. आम्ही तिघं या विषयावर काम करत होतो, त्यातूनच ‘सिटीझन’ चित्रपटाची निर्मिती झाल्याचं या तिघांनी सांगितलं.
‘सिटीझन’ चित्रपटाची कथा अमोल शेटगे, व राजश्री लांडगे यांची आहे. कथेच्या अनुषंगाने चित्रपटात गीतांचा सुरेख वापर करण्यात आला असून अविनाश-विश्वजीत यांच संगीत या गीतांना लाभलं आहे. सुरेश देशमाने यांच छायांकन असून कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचं आहे. संकलन सर्वेश परब यांनी केलं आहे. राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठ, यतीन कार्येकर, पुष्कर श्रोत्री, उदय टिकेकर, नंदिनी जोग, श्रीरंग देशमुख, माधव देवचक्के, कौस्तुभ दिवाण, सुषमा देशपांडे, ऋषी देशपांडे, प्रतीक जंजिरे, सुनील रानडे आदि कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
चित्रपटाच्या माध्यमातून कॉलेज जीवनाचे वास्तव उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शकांना जे वास्तव अधोरेखित करायचं आहे ते अनेकांना माहीत आहे; पण ते स्वीकारून त्यात बदल करण्याची धमक फार कमीजण दाखवतात. एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न ‘सिटीझन’ चित्रपटात करण्यात आला आहे.
येत्या १६ ऑक्टोबरला ‘सिटीझन’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment