Saturday, May 9, 2015

पाचगणीत ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग' ची धूम


पहिल्या सामन्यात ‘फटका औरंगाबाद’ संघाची सरशी

खचाखच भरलेले स्टेडियमएका एका धावेबरोबर वाढत चाललेला उपस्थित कलाकारांचा प्रतिसाद. कधी टाळयाकधी शिट्टया तर कधी आरोळया. अशा जोशपूर्ण वातावरणात महाराष्ट्र कलानिधी आयोजित ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीगमधील सामन्यांची आज पाचगणीत दमदार सुरवात झाली.
पहिल्या दिवशी ‘फटाका औरंगाबाद विरुद्ध कोहिनूर नागपूर यांच्यातला चुरशीचा सामना रंगला आणि अभिजीत कवठाळकरच्या नेतृत्वाखाली लीगमधल्या ‘फटाका औरंगाबादने पहिल्या विजयाचा मान मिळवला. दुसरा सामना ‘रत्नागिरी टायगर्स’ विरुद्ध ‘क्लासिक नाशिक’ यांच्या मध्ये रंगला आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात सिद्धार्थ जाधवच्या ‘रत्नागिरी टायगर्स’ ने बाजी मारली.

खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेल्या या सामन्यांची रंगत उत्तरोत्तर वाढत होती. सामना जिंकण्याच्या टेन्शन बरोबर मजा मस्तीलाही उधाण आलं होत. गेल्यावर्षीचा अनुभव गाठीशी घेऊन मैदानात उतरलेले कलाकार चांगलीच फटकेबाजी करत होते.सेलिब्रिटींची फुल टू धम्माल या सामन्यांच्या वेळी पाहायला मिळत होती.

'मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रोमहर्षक क्रिकेटचा आनंद लुटण्याची संधी कलाकारांना मिळाली आहे.

No comments:

Post a Comment