Sunday, May 10, 2015

‘MEGHA COMPETITION OF MAHARASHTRA’

नवोदित कलाकारांसाठी सीएफएस व ए. आर संस्थेचा उपक्रम
‘MEGHA COMPETITION OF MAHARASHTRA’ ची घोषणा


मनोरंजन विश्वात आपला ठसा उमटविण्याच्या आशेने दररोज कित्येक कलावंत मुंबईत येत असतात. होतकरू गुणवंतांच्या गुणवत्तेला योग्य दिशा-मार्गदर्शन मिळणं खरं तर खूप गरजेचं आहे. हीच बाब हेरतसीएफएस आणि ए. आर. क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा कॉम्पिटीशन्स ऑफ महाराष्ट्र’ ही राज्यस्तरीय भव्य स्पर्धा नवोदितांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेची घोषणा व सीएफएस व ए. आर संस्थेच्या आगामी उपक्रमाबद्दलची माहिती नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सीएफएसचे राष्ट्रीय समन्वयक के.डी राठोड, ए. आर क्रिएशन चे पी.डी राठोड, क्रिएटीव्ह हेड शिरीष राणे, प्रदीप पटवर्धन, अमृता राव, मानसिंग पवार, अमेय दाते, मिलिंद इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे क्रिएटीव्ह हेड शिरीष राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ही स्पर्धा होतकरू युवा कलाकारांसाठी मोलाची ठरेल. अधिकाधिक कलावंतांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मान्यवरांनी केले.

अभिनय-नृत्य-गायन या सोबतच फिल्म मेकिंगएडिटिंग अशा पडद्यामागील तंत्राची ओळखत्याकरिता विशेष व्यासपीठही उपलब्ध व्हावे आणि सिनेक्षेत्रातील दिग्गजांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हा मेगा कॉम्पिटीशन्स ऑफ महाराष्ट्रचा मूळ हेतू आहे. या स्पर्धेअंतर्गत १ करोडची बक्षिसे जिंकता येऊ शकणार आहेत.

फिल्म इंडस्ट्रीच्या विकासाकरिता सीएफएस संस्था अनेक उपक्रम भविष्यात राबवणार आहे. प्रत्येक राज्यात आधुनिक फिल्मसिटी आणि आधुनिक स्टूडियो उभारले जात असून मुंबईपुणे येथे सॅफ्रॅन (saffron)फिल्मसिटी आणि माथेरानमध्ये स्टार वैली’ (Star Valley)  या फिल्मसिटी प्रोजेक्टचे काम ही वेगाने सुरु झाले आहे. सीएफएस आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म इन्सिटट्युट उभारणार असून चित्रपट प्रशिक्षण संस्थांनी सीएफएसशी संलग्न व्हावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.

 जिल्हा व राज्यस्तरीय पातळीवरील मेगा कॉम्पिटीशन्स ऑफ महाराष्ट्र’ सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली ठेवली जाणार आहे. स्पर्धकांनी www.megacompetitions.com  या वेबसाइटवर आपली नोंदणी रजिस्टर करावी किंवा वेबसाइटवर दिलेल्या ईमेलचा वापर करुन स्पर्धेत सहभागी व्हावे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

No comments:

Post a Comment