Thursday, December 25, 2014

’ये रे ये रे १५’

कुठल्याही पार्टीपेक्षा खास , स्टार प्रवाहचा गोल्डन पास 








मुंबई,२४ डिसेंबर २०१४: डिसेंबर महिना सुरु झाला की नवीन वर्षाची चाहूल लागते. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनचे वारे सगळीकडे वाहू लागतात. कुटुंबातील प्रत्येकजण सेलिब्रेशनचे वेगवेगळे प्लान्स आखतात. नवीन वर्षाच्या स्वागताचा हा आनंद व्दिगुणित करण्यासाठी मनोरंजनाने परिपूर्ण आणि धमाकेदार संध्याकाळचा 'गोल्डनपास' स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या दर्शकांसाठी आणला आहे. ३१ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ८ वाजल्यापासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ये रे ये रे १५हे सेलिब्रेशन सुरु होणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर ३१ डिसेंबर साठी प्रथमच ४ तास मनोरंजन सादर केले जाणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील दर्शकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा एका पेक्षा एक बहारदार परफॉरमन्स सादर करणार आहेत.  यानिमित्ताने स्टार प्रवाह कुटुंबातील सर्व  व्यक्तिरेखा  प्रथमच एका मंचावर एकत्र येत आहेत.
आपल्या दर्शकांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकारांनी देखील  'कुछ हटके' प्लान केला आहे. नेहमी पडद्यावर आपले मनोरंजन करणाऱ्या प्रमुख जोड्या दर्शकांसाठी  रेट्रो ,इंडो-वेस्टर्न , बॉलीवूड ,कंटेंम्पररी  असे वेगवेगळे डान्सफॉर्म सादर  करणार आहेत .तर दर्शकांच्या आवडत्या आक्कासाहेब आणि जीजी प्रथमच अनेक रंगतदार पार्टी गेम मराठी  टेलिव्हिजनवर  खेळणार आहेत . याचबरोबर   दिगंबर नाईक ,संकेत भोसले , अभिजित चव्हाण ,सुहास परांजपे हे लोकप्रिय कलाकार कॉमेडीचा तडका देणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टार  प्रवाह वाहिनी आपल्या दर्शकांच्या आयुष्यात देखील डोकावून बघून आपले दर्शक ३१  डिसेंबरचा  उत्सव कसा साजरा करतात याची झलक  दाखविणार आहेत . तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व खलनायकांचा जंगी कलगी -तुरा सामना रंगणार आहे. दर्शकांची खास वाहव्वा मिळवणारे गायक आदर्श शिंदे लोकप्रिय गाण्यांचा नजराणा पेश करणार आहेत. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर दिलखेचक  नृत्याविष्कार सादर करणार आहे.
या प्रसंगी बोलताना स्टार प्रवाह वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील म्हणाले की," दर्शकांना स्टार प्रवाहच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे  स्वभाव खूपच परिचयाचे आहेत .’ ये रे ये रे १५ या कार्यक्रमात प्रेक्षकांना एक सुखद अनुभुती देण्यासाठी या सगळ्या व्यक्तिरेखा मनोरंजनाचा आगळा वेगळा अविष्कार सादर करणार आहेत. या नवीन वर्षात स्टार प्रवाहवरील मालिकांच्या कथानकात अनेक बदल होतआहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे. त्याची झलक या कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शकांना बघायला मिळणार आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ही पेशकश दर्शकांना नक्कीच आवडेल."
तर नाचगाण्यांची धमाल, सुपरस्टार्सची कमाल ,मनोरंजनाच्या  अनलिमिटेड मेजवानीचा आस्वाद घ्यायला विसरू नका  !
रात्री ८ वाजल्यापासून
फक्त स्टार प्रवाहवर

’ये रे ये रे १५’

No comments:

Post a Comment