Thursday, December 25, 2014

'यस आय कॅन'सकारात्मक दृष्टीकोन देणारा 


दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य ते साध्य करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात असली तरी काहींनाच ती प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करता येते. आपल्यातील कलागुणांना योग्य ती दिशा देत त्यात उत्तम करिअर करता येत. ज्यांना काही समस्यांमुळे आपली आवड जपता येत नाही ते पुढे जीवनात आपला आत्मविश्वास गमावून बसतात. अशाच आशयाच्या सकारात्मक कथा विषयावर बेतलेल्या नवीन सिनेमाची निर्मिती 'यस आय कॅन' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने होतेय. 'जिगवी प्रॉडक्शन' निर्मित 'यस आय कॅन' चित्रपटाचा मुहूर्त सुप्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या हस्ते नुकताच पार पडला असून चित्रीकरणास सुरवात करण्यात आली आहे. अनेक गाजलेल्या हिंदी - मराठी मालिकांच्या दिग्दर्शिका संगीता राव यांचा चित्रपट दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे

मुहूर्त प्रसंगी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्यावर मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला असून राजेश शृंगारपुरे, बाल कलाकार मिहिर सोनी हे कलाकार देखील यात सहभागी झाले होते. या मुहूर्त प्रसंगी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा द्यायला कॅमेरामन- दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, हर्षदा खानविलकर, ब्राइट ॅडव्हर्टायझिंगचे योगेश लखानी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना महेश कोठारे यांनी,' दिग्दर्शिका संगीता राव ही उत्तम दिग्दर्शिका असून ती दिग्दर्शित करीत असलेला पहिला सिनेमा नक्कीच चांगल्या प्रकारे सादर करेल' असा विश्वास व्यक्त करीत चित्रपटाच्या टीमला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या निमित्ताने करण्यात येतोय

वडील - मुलाच्या नातेसंबंधांवर आधारित 'यस आय कॅन' ची कथा अमित शहा यांनी लिहिली असून पटकथा अभिजीत गाडगीळ संगीता राव यांनी लिहिली असून संवाद अभिजीत गाडगीळ यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे छायांकन नरेन गेडीया करीत असून संगीत - अक्षय खोत, कलादिग्दर्शन- राजू साप्ते, नृत्यदिग्दर्शन - सिद्धेश पै , ध्वनी - जावेद शेख, कार्यकारी निर्माता - शेखर नागवेकर, संकलन - हरकिरन लाल सिंग अशी इतर श्रेयनामावली आहे. 'यस आय कॅन' चित्रपटात राजेश शृंगारपुरे, नीना कुलकर्णी, मिहीर सोनी यांच्यासह मृणाल ठाकूर परेश गणात्रा यांच्या देखील भूमिका आहेत


No comments:

Post a Comment