Sunday, June 29, 2014

अशोकशिंदेयांचं रंगभूमीवरकमबॅक


अशोक शिंदे यांचं रंगभूमीवर कमबॅक

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ  नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये नायकखलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका साकारणाऱ्या अशोक शिंदे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत१११ चित्रपटांचा टप्पा ओलांडलेल्या अशोक शिंदे यांनी आजतागायत विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. १३०० भागांची मजल गाठलेल्या 'स्वप्नांच्या पलिकडले'  मालिकेत त्यांनी साकारलेली यशवंत पाटकर ही भूमिका घराघरांत पोहोचली. आता तब्बल १२ वर्षानंतर अशोक शिंदे पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर पदार्पण करताहेत 'अमोघ निर्मित' , 'प्रेम.. प्रेम असतंया नाटकातून


आजच्या दैनंदिन जगण्यात नातेसंबंधात आलेला ताण तणाव, अविश्वास यावर भाष्य करत हे नाटक नात्यातील मैत्री शोधण्याचाही कानमंत्र देतं. या नाटकात अशोक शिंदे हे प्रितम बांदेकरची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून मैथिली वारंग त्यांच्या पत्नीची भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत पंकज खामकर आणि गौरी देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. नाटकाची निर्मिती संतोष आंबेरकर, शेखर मांजवकर यांनी केली असून लेखन दिग्दर्शन संतोष आंबेरकर यांचे आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रवीण गवळी यांनी केलंय. सायन्स फिक्शनवर आधारित 'सहकुटुंब डॉट कॉम' असो वा 'मास्टरप्लॅन'सारखे रहस्यमय नाटक अशोक शिंदे यांनी आपल्या भूमिकांनी प्रत्येक भूमिकेचे सोनं केलंय. त्याचीच प्रचीती आगामी 'प्रेम.. प्रेम असतं' या नाटकातून रसिक प्रेक्षकांना येणार आहे. प्रेक्षकांची रंगमंचावरून चटकन मिळणारी दाद त्यांना नेहमीच खूप महत्वाची वाटते. याकरिताच अशोक शिंदे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर येताहेत. येत्या  जुलैला 'प्रेम.. प्रेम असतंनाटकाचा मुंबईत शुभारंभ होतोय

No comments:

Post a Comment