Monday, March 2, 2020

‘भयभीत’ चित्रपटाचा शानदार प्रीमियर


ट्रेलर पासून  उत्सुकता  निर्माण करणाऱ्या भयभीत’ या चित्रपटाचा शानदार  प्रीमियर सोहळा  नुकताच मान्यवरांच्या  उपस्थितीत संपन्न  झाला. चित्रपटातील कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील  अनेक  मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला हजेरी लावली. यात किशोरी शहाणेसीमा देशमुखराधिका हर्षेगायत्री दातारभाग्यश्री लिमयेनिथा शेट्टीपौर्णिमा डेगौरी किरण  या  अभिनेंत्रीसोबत  दिग्दर्शक ओम राऊतस्वप्ना  वाघमारे-जोशीअभिजीत देशपांडेविश्वास जोशीशशांक उदापूरकरवैभव चिंचाळकरलेखक विश्वास पाटीलगायिका जान्हवी प्रभू अरोरा आदि मान्यवर उपस्थित होते.
यातील प्रश्न आपल्याला गुंतवून ठेवतात. आपल्याकडून काही घडलं आहे  हे  दाखवून देणारा मानसिक संघर्ष शेवटपर्यंत  उत्तम पद्धतीने मांडला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितीत मान्यवरांनी  यावेळी  दिल्या. रहस्यमयी कथेला लाभलेली  गूढ संगीताची अचूक साथ चित्रपटगृहात आपल्याला 'भयभीत' करून सोडते असं सांगतआजवर मराठीत आलेला उत्तम भयपट अशा शब्दात उपस्थितीत मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक  केले आहे.  कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर आणि वेगात घडणाऱ्या घटना हे देखील 'भयभीत'चं वैशिष्ट्य आहे
आईच्या अचानक झालेल्या मृत्यनंतर मानसिक धक्का बसलेल्या श्रेयाच्या वागणुकीत रहस्यमयी बदल या एकाच धाग्याभोवती  या  चित्रपटाचे नाट्य रचले आहे.  दिपक नायडू दिग्दर्शित भयभीत’  चित्रपटात  सुबोध भावेपूर्वा गोखलेगिरीजा जोशीमधू शर्मामृणाल जाधवयतीन कार्यकर आदि कलावंतांच्या भूमिका आहेत. अभय सिन्हा, ‘अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची  प्रस्तुती असलेल्या या  चित्रपटाची निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची आहे. अविनाश रोहरापवन कटारियासमीर आफताबप्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

No comments:

Post a Comment