Tuesday, September 24, 2019

सीएसआर टाईम्स अवॉर्ड्स 2019 मध्ये ग्रँड मराठा फाउंडेशन ठरली सर्वोत्तम एनजीओ




मुंबई20 सप्टेंबर2019: महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता संस्थापक रोहित शेलाटकर यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे 18 सप्टेंबर 2019 रोजी ग्रँड मराठा फाउंडेशन, या सरकारएतर संघटनेला मानाच्या सीएसआर टाईम्स अवॉर्ड्सने गौरविण्यात आले.    
त्यांच्या द्रष्ट्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या या संघटनेला रोजगार या गटाखाली वतृक्षा कार्यकुशल (बचतगटांतील महिलांकरिता कौशल्य विकास शिबिर), किसान प्रगती मेळावा (जैविक शेतीवरील शिबीर) आणि किसान दिवस शेतकरी मेळावा (बियाणे, कीटकनाशक आणि इतर शेतीसंबंधी गरजांचे वितरण) या त्यांच्या अद्वितीय कार्यक्रमासाठी सर्वोत्तम एनजीओचा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार ग्रँड मराठा फाउंडेशनच्या विश्वस्त माधवी शेलाटकर यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी फिजी हाय कमिशनचे हाय कमिशनर योगेश पंजा आणि लाल बहादूर शास्त्री फाउंडेशनचे अध्यक्ष, वरिष्ठ नेते आणि आयएएफचे प्रमुख सहायक सुनील शास्त्री यांची उपस्थिती होती.
श्री. शास्त्री हे थोर क्रांतिकारक लाल बहादूर शास्त्री यांचे सुपुत्र असून त्यांनी ‘जय जवान, जय किसान नारा दिला होता. शास्त्री यांनी आपल्या वडिलांचे शब्द आणि विचारांपासून प्रेरणा घेऊन ग्रँड मराठा फाउंडेशनने शेतकऱ्यांसोबत नाळ जोडली, त्यांना चांगला रोजगार मिळावा आणि गरीबीचे दुष्टचक्र मोडीत काढण्याच्या उद्देशाने ही संघटना सुरू करण्यात आली आहे.  
या प्राप्त पुरस्काराविषयी बोलताना ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलाटकर म्हणाले की, “मला सीएसआर टाईम्स अवॉर्ड्स 2019 मध्ये सर्वोत्तम एनजीओ म्हणून आमची निवड झाल्याचा अतिशय आनंद आहे. आमचे ग्रँड मराठा फाउंडेशनमध्ये हेच ध्येय आहे की, शेतकऱ्यांचे सबलीकरण करून त्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन शाश्वत पर्याय वृद्धिंगत होतील. आमचे संपन्न कार्यक्रम हे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास करण्यास साह्य करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांना भविष्यासाठी तयार करण्यात मदत होईल. आम्हाला विश्वास वाटतो की, या उपक्रमात हा मापदंड आम्हाला गाठता येईल, तसेच आगामी काळात अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचता येईल.”  
या कार्यक्रमात काही मातब्बर व्यक्तींची उपस्थिती लाभली. ज्यामध्ये खासदार मनोज तिवारी, अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त (एमएसएमई) राम मोहन मिश्रा आणि सीएसआर टाईम्स, इंडियन अचिव्हर्स फोरमचे संपादक आणि कार्यकारी संचालक हरीश चंद्रा यांचा समावेश होता.
ग्रँड मराठा फाउंडेशन विषयी:
ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जातेत्यामध्ये आधुनिक तंत्राची योग्य किंमत समाविष्ट असून शेतकऱ्यांच्या पाठी लागलेले कर्ज व गरिबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साह्य देऊ करण्यात येतेत्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक क्रियाकलाप राबवून विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाळांना संगणक दान करून त्यांनी ई-लर्निंगची ओळख करून दिली व त्याला प्रोत्साहन देत आहेत. 
"आम्हाला शेतकऱ्यांना भविष्यासाठी सज्ज करायचे आहे. त्यांच्या समोर दैनंदिन आयुष्य जगताना येणाऱ्या समस्या कमी करायच्या असून त्यांना उत्तम जीवन जगण्यासाठी सबळ करायचे आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रशिक्षण मिळेल अशी संस्था सुरू करण्याची आमची योजना आहे." 


No comments:

Post a Comment