मँड्रेम, २२ फेब्रुवारी – गोवा टुरिझमच्या कोस्टल सर्किट विकास प्रकल्पाअंतर्गत मँड्रेममधील प्रसिद्ध अश्वेम समुद्रकिनारा त्याला देण्यातआलेल्या नव्या रुपामुळे प्रकाशझोतात आला आहे.
माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी आज अश्वेम समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन केले.यावेळेस माननीय अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे, श्री. प्रदीप हडफडकर, सरपंच व्ही. पी. मँड्रेम, श्री. डेनिस ब्रिट्टो, उपसरपंच व्ही. पी. मँड्रेम,व्ही. पी. पंच सदस्य, गोवा टुरिझमचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्य विकासकाम हे १४४४ चौरस मीटर्स जागेवर उभारण्यात आलेल्या पार्किंग सुविधेसाठी २.२६ कोटी रुपये खर्चून करण्यात आले आहे.या परिसराचा विकास करण्यात आला असून आता त्यात ५० दुचाकी आणि अंदाजे १५ चारचाकी गाड्यांना पार्किंग सुविधा, एसटीपीसहटॉयलेट, लँडस्केपिंग, प्रकाशयोजना, सुरक्षा भिंत आणि सुरक्षा केबिन तसेच सीसीटीव्ही सुविधेचा समावेश करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment