पणजी, 24 फेब्रुवारी – मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि नृत्य कलाकार विल्यम अनीस यांची गोवा कर्नावल २०१९ साठीकिंग मोमो म्हणून निवड झाली आहे.
गोवा टुरिझमने स्थापन केलेल्या समितीने आज २ ते ५ मार्च २०१९ दरम्यान होणाऱ्या गोवा कर्नावलसाठी आलेल्या तीन अर्जादारांमधूनविल्यम अनीस यांची निवड केली.
५३ वर्षांचे व्ल्यम अनीस हे पणजीचे रहिवासी असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोजचे निवेदक म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्धआहेत. अनीस त्यांच्या सर्वोत्कृष्ट नृत्य सादरीकरणाच्या निमित्ताने गोवा कर्नावल फ्लोटचा भाग आहेत आणि १९८२ पासून त्यांनीकर्नावलदरम्यान फ्लोट परेडसाठी आपले सर्वोत्तम योगदान दिले आहे.
उंच, रूबाबदार व्यक्तिमत्त्वाचे अनीस मस्कत, दुबई, अबू धाबी, दास बेट अशा व इतर आंतरराष्ट्रीय रंगमचांवर गोव्याचे संगीत वनृत्याचा प्रचार करत चमकले आहेत. राज्याच्या राजधानीत कर्नावल नृत्याचे आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीआहे.
पहिल्यांदाच किंग मोमो बनत असल्यामुळे भारावून गेलेले अनीस म्हणाले, ‘किंग मोमो बनावं अशी माझी केव्हापासूनची इच्छा होतीआणि आता मी राज्यात होत असलेल्या चार दिवसीय कर्नावलला भेट देणाऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. किंगमोमोच्या चार दिवसांच्या कार्यकाळात मी शांतता, एकोपा आणि स्वच्छ व हरित गोव्याचा प्रसार करण्यावर भर देणार आहे.’
No comments:
Post a Comment