Wednesday, September 26, 2018

दिग्दर्शक विश्वास जोशी यांचा ‘घ्ये डब्बल’


सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत अगदी क्वचित आढळतात. चाकोरीबाहेरचा दृष्टीकोन ठेवत वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्यांच्या या यादीत आता दिग्दर्शक विश्वास  जोशी  यांचा  समावेश करता येईल‘What’s up लग्न  या चित्रपटाच्या यशानंतर घ्ये डब्बल या आपल्या आगामी मराठी चित्रपटातून एक वेगळा विषय ते प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. घ्ये डब्बल या हटके शीर्षकामुळे या चित्रपटाची खासियत काय असणारयाची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज, महेश मांजरेकर व नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत गणरायाच्या चरणी या चित्रपटाच्या लेखनाची प्रत ठेवण्यात आलीया साऱ्यांच्या शुभेच्छा आणि गणरायाचा कृपाशीर्वाद या चित्रपटाला लाभेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.शेक्सपिअर च्या कॉमेडी ऑफ एरर्स’ या जगप्रसिद्ध नाटकावरून प्रेरित असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन हृषीकेश कोळी व विश्वास जोशी यांचे आहे. 
या चित्रपटात दोन हिरोंचे डबल रोल असणार आहेत. हे दोन हिरो कोण असणार ? आणि चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात असल्याने घ्ये डब्बल चित्रपटात नेमकं काय असणार याची उत्सुकता निश्चितच निर्माण होणार आहे.
२०१९ मध्ये प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करण्यासाठी घ्ये डब्बल लवकरच सज्ज होणार आहे.

No comments:

Post a Comment