संघर्ष माणसाला त्याच्या स्वप्नांपर्यंत, ध्येयापर्यंत नेऊ शकतो....संघर्ष करणारी माणसंच नेहमी यशस्वी होतात. या आशयाचा संदेश देणाऱ्या 'तू तिथे असावे' या आगामी प्रेरणादायी मराठी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँण्च सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणी प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करणारी आहेत.
गणेश पाटील 'तू तिथे असावे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, संदेश बुरबुरे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. भूषण प्रधान, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरूण नलावडे, मोहन जोशी, जयवंत वाडकर, श्रीकांत वट्टमवार,अभिलाषा पाटील, विशाखा घुबे, मास्टर तेजस पाटील या कलाकारांच्या भूमिका 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत.
वेगवेगळ्या पठड्यातील सहा गाणी 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत. दिनेश अर्जुना हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत तर गीतकार मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव, दौर सैफ हे आहेत. या गीतांना आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.
चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. ध्वनी अनुप देव यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन जीत सींग यांनी केले आहे. वेशभुषा कैलाश ब्राम्हणकर तर रंगभूषा अभय मोहिते यांची आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी विक्रांत स्टुडिओनी सांभाळली आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.
'जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'तू तिथे असावे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment