Monday, July 2, 2018

‘गोटया’ चा खेळ ६ जुलैला रंगणार चित्रपटगृहात


खेळातली रंजकताखेळाडूच्या आयुष्यातील संघर्षाचे प्रतिबिंब आजवर अनेक चित्रपटातून उमटले आहे. बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत.  हुतूतू’, ‘लपंडाव’, ‘आंधळी कोशिंबीर’, विटी दांडू’, लगोरी हे पारंपरिक खेळ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. काही अपवाद वगळता हल्लीची मुले हे खेळ फारसे खेळताना दिसत नाही. आजच्या पिढीला विस्मृतीत गेलेल्या खेळातील गंमत दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे व निर्माते जय केतनभाई सोमैया यांनी गोटया या आगामी मराठी चित्रपटातून केला आहे. येत्या ६ जुलैला गोट्यांचा खेळ चित्रपटगृहात रंगणार आहे. आरोग्य टिकवायचे असेल निसर्गाशी समतोल राखणारे मातीतले खेळ खेळणे गरजेचे आहे. जीवनात खेळाचं महत्त्व उरलेलं नसल्याचं विदारक चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर येणारा गोटया हा चित्रपट क्रीडासंस्कृती टिकविण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
खेळातून अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू शकतो हे दाखवतानाच गोटयांची आवड असणाऱ्या गोटया या मुलाच्या इर्षेची कथागोटया चित्रपटातून उलगडली जाणार आहे. हा खेळ शाळेत शिकवावा यासाठी गोटयाने प्रशिक्षकाच्या मदतीने केलेली धडपड रंजकपणे मांडतानाच या खेळाबद्दलच्या विविध गोष्टी जाणण्याची संधी हा चित्रपट देणार आहे. बालपणी जीवापाड जपत खेळलेल्या गोटयांकडे व्यावहारिक जगात केवळ टाइमपासम्हणून पाहिलं जात असलं तरी या मानसिकतेला छेद देत गोटया हा खेळ कसा उत्तम आहे हे या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
खास मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या जाणाऱ्या मातीतल्या या खेळांमुळे रंजनातून मुलांमधील सर्जनशीलतात्यांची विचारक्षमता आणि विवेक वाढीस लागतो असे असताना मातीतल्या खेळांचा विसर आज सगळ्यांना पडला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने या खेळांना पुनरुजीव्वन प्राप्त व्हावे व हे खेळ आनंद देऊ शकतात हे सांगण्याचा आमचा उद्देश असल्याचा दिग्दर्शक व निर्माते सांगतात.
संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गोटया चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली आहेत. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला पार्श्वसंगीत दिलं आहे. भगवान पाचोरे लिखित चला सारे जग जिंकूया’, ‘ढाय लागली’, ‘गोल गोल गोटीचा गोल’ ‘गोटीवर गोटी’, ‘ढाय लागली’ रिमिक्स या पाच गाण्यांना गायक अवधूत गुप्ते,बेला शेंडेआदर्श शिंदेजसराज जोशीकौस्तुभ गायकवाडआकाश आगलावे यांचा स्वर लाभला आहे. नैनेश दावडा आणि निशांत राजानी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
केतनभाई सोमैया प्रस्तुतविहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऋषिकेश वानखेडेराजेश श्रृंगारपुरेसयाजी शिंदे,आनंद इंगळेकमलाकर सातपुतेसुरेखा कुडचीहेमांगी रावशरद सांखला,शशांक दरणेपोर्णिमा आहिरे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग् दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असूनराहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. रंगभूषा ललित कुलकर्णी यांची तर वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
६ जुलैला गोटया प्रदर्शित होणार आहे.



The Game of ‘Gotya’ in Theatres From The 6th of July.

The colourfulness of a sport and the reflections of a sportsman's struggles have left their imprints in many a movie. Along with changing times sports too has changed. Traditional games like ‘Hututu’, ‘lapan-daav (hide and seek)’, 'aandhalikoshimbir’, viti-dandu, lagori are on the way to extinction. Nowadays, excluding some exceptions, hardly any kids are seen playing these games. Director Bhagwan Vasantrao Pachore and producer Jai Ketanbhai Somaiya have tried to familiarise the present generation with these games, which have virtually gone into oblivion. The  movie  ‘Gotya will be released on the6th of July’. To safeguard one's health it's necessary to play games which are rooted to the soil. It is a glaring horrorthat in our lives, the value  of sports is on the decline. Against this background, an honest attempt is made through this movie 'Gotya’ to sustain the culture of sports.

We can teach a lot of things in life through  sports, which are apart from the curriculum. While depicting this through thegame of 'gotya’, the jealousy of the  kid Gotya is also shown. With the help of the sports teacher, Gotya  tries his best to get the sport of Gotya to be taught in the school itself. This struggle of Gotya teaches us a lot about the game in a very entertaining manner. Gotya plays the game with great, passion but everybody else in this commercial world looks at itas only a pastime. We get to see how Gotya punctures this kind of mentality, and  shows what a wonderful game 'Gotya’ is.

Through these games of the soil, so much a part of the emotional world of a child, we learn about the patience, the thinking capability and the discretion that a child learns from these games. In spite of this we are forgetting these games. Through this movie the producer and the director hope to revive these games and want to show how much joy and pleasure these games provide us.

Music director Avadhut Gupte has written the score and recorded the songs of the film 'Gotya’. Rohit Nagbhide has scoredthe background music. The lyrics  written by Bhagwan Pachore,'Chala sare Jag jinkuya', 'Dhaya lagali', 'Gol gol goticha gol', 'Gotivar goti' and 'Dhaya lagali remix'.... these five songs have been sung by Avadhut Gupte, Bela Shende, Adarsh Shinde, JasrajJoshi, Kaustubh Gaikwad and Aakash Aaglave. Nainesh Davda and Nishant Rajani are the co-producers of the film.

Ketanbhai Somaiya presented, Vihaan Productions and Dwara Motion Pictures produced, the film has the following actors...Rishikesh Wankhede, Rajesh Shringarpure, Sayaji Shinde, Anand Ingle, Kamlakar Satpute, Surekha Kudchi, HemangiRao, Sharad Sankhla, Shashank Dharne, and Pornima Ahire. Story-screenplay-dialogues-lyr ics and direction are by Bhagwan Pachore. Cinematography is by Bashalal Sayed and editing is by Rahul Bhatankar. Choreography is by Ganesh  Acharya.  The art  director  is  Sandeep  Inamke,  makeup  is  by  Lalit  Kulkarni  and costumes   by   Namdev   Waghmare.   Babasaheb  Patil   and   Vishal   Chavan  are  the executive-producers of the film.

No comments:

Post a Comment