समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी –परंपरा, श्रद्धा अंधश्रद्धांचा वेध आजवर चित्रपटांतून घेण्यात आला आहे. मराठी चित्रपटही त्यात मागे नाही. असंख्य मराठी चित्रपटांतून या अपप्रवृत्तींवर कडाडून टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा ‘फांदी’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. अजित साबळे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मनोरंजनाच्या माध्यमातून परिणामकारकरीत्या गोष्टी मांडता येतात’. श्रद्धा व अंधश्रद्धेच्या मानवी खेळाचा वेध घेणाऱ्या माझ्या ‘फांदी’या पहिल्या कलाकृतीचा आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना या चित्रपटाला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार दिग्दर्शक अजित साबळे यांनी याप्रसंगी मानले.
कुणाल-करण लिखित ‘देवा सांग ना तू कुठे गेला’, ‘मला भेटा ना दुपारी’, ‘किमया झाली गावामंदी’ अशी कथेला पूरक तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतांना कुणाल-करण यांनीच संगीतबद्ध केलं आहे.
अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. सायली शशिकांत पाटणकर ‘फांदी’ चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा, संवाद अजित साबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. कलादिग्दर्शन राहुल व्यवहारे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस,अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
२० जुलैला ‘फांदी’ प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment