Friday, March 9, 2018

‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा


वयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. त्याअपेक्षांच्या आणि परंपरेच्या जोखडातून मुलीच्या  लग्नाचं कर्तव्य पार पाडायचे असतेजयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन यांची प्रस्तुती असलेल्यातुला पण बाशिंग बांधायच या आगामी मराठी चित्रपटातून लग्नाच्या अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच सहाय्यक राज्यकर आयुक्त अन्वेषणचे श्री. चेतन भिंगारे यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी  केली असून  दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनीच सांभाळली आहे. तुला पण बाशिंग बांधायच’  हा चित्रपट ३० मार्चला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांनी या चित्रपटाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
हा चित्रपट व गीते प्रेक्षकांना नक्कीच आवडतील असा विश्वास निर्माते व दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांनी व्यक्त  केला. या वेगवेगळ्या धाटणीची ५ गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडेसुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे.
वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षात्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे,रितेश नगराले, राहुल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या  चित्रपटात आहेत.चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारीप्रमोद वेदपाठकसुभाष चव्हाणऔदुंबर व्यवहारे यांचे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,सवांद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी  तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनी आरेखन प्रमोद चांदोरकर यांनी  केले आहे. रंगभूषावेशभूषा विजय मगरे यांची आहे.
तुला पण बाशिंग बांधायच’ ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment