Saturday, September 30, 2017

वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअप लग्न’


कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातील वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे ही हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. व्हॉट्सअप लग्न या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल. नटसम्राट’ चे निर्माते विश्वास जोशीआणि दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ म्हणजेच पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रमाणे वर्षभर किंवा सहा महिने आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्याची परंपरा आहेत्याप्रमाणेच व्हॉट्सअप लग्नच्या निर्मात्यांनीही जवळजवळ चार महिने अगोदर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करीत सुनियोजित पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याचा संदेश दिला आहे. म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे. प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐन वेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलचपण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही व्हॉट्सअप लग्न च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे नटसम्राट’ या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असूनपोस्ट प्रोडक्शनचं काम लवकरच पूर्ण होईल.

No comments:

Post a Comment