Tuesday, June 14, 2016

दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार ‘झी टॉकीज’वरमराठी चित्रपटक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा. कलाकारांच्या एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कारांनी नटलेलादादासाहेब फाळके मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा २०१५ येत्या रविवारी १९ जूनला सायंकाळी सात वाजता झी टॉकीजवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

मयुरेश पेम याने सादर केलेला शिव तांडवाचा नेत्रसुखद अविष्कार, मानसी नाईक व आदिनाथ कोठारे यांनी जुन्या गीतांवर केलेलं बहारदार नृत्य, राकेश बापट, वैदेही परशुरामी, पूजा सावंत, संस्कृती बालगुडे, श्रुती मराठे, दिपाली सय्यद, वैभव तत्ववादी यांच्या हटके नृत्यजलव्याची धमाल तसेच सोहळ्याचा उत्कर्षबिंदू ठरलेला अभिनेत्री मानसी नाईकचा वॅाटर अॅक्ट डान्स असा नजराणा या सोहळ्यात पहायला मिळणार आहे. या धमाकेदार परफॉर्मन्ससोबत अतुल तोडणकर, अरुण कदम, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव यांची पोट धरून हसवणारी प्रहसननाट्ये, केतकी माटेगावकारच्या सुरेल गाण्यांचा आस्वाद अशा एक से बढकर एक मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाविष्कारांनी तसेच सिद्धार्थ चांदेकर व मृण्मयी देशपांडेच्या खुमासदार सुत्रसंचलनाने रंगलेला हा सोहळा प्रेक्षकांना ‘झीटॉकीजवर पहाता येणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संगीतकार अजय-अतुल अभिनेता सुमीत राघवन मि.वर्ल्ड ठाकुर अनुप सिंग या पाहुण्यांसोबत अवघ्या मराठी कलाकारांच्या उपस्थितीने संपन्न झालेलादैदीप्यमान दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा रविवार १९ जूनला सायंकाळी ७ वाजता झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार २०१५ च्या सोहळ्यात अनेक विभागात पुरस्कार देण्यात आलेत. चित्रपट पुरस्कारासाठी लय भारी (जितेंद्र ठाकरे, अमेय खोपकर, जेनेलिया देशमुख), कॅण्डल मार्च (निलेश आणि अंजली गावडे), एलिझाबेथ एकादशी (एस्सल व्हिजन, परेश मोकाशी), रेगे (अभिजीत पानसे), टपाल (वर्षा मधुसूदन सत्पाळकर ) या चित्रपटांना नामांकन जाहीर झालं होतं तर लक्षवेधी चित्रपट म्हणून समृद्धी पोरे यांचा डॉ. प्रकाश बाबा आमटे या एकमेव चित्रपटाची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी निशिकांत कामत (लय भारी), लक्ष्मण उतेकर (टपाल), परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी), अभिजीत पानसे (रेगे), गणेश कदम (विटी दांडू) यांना नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी रितेश देशमुख (लय भारी), सुबोध भावे (लोकमान्य), अंकुश चौधरी (क्लासमेट्स), सुमित राघवन (संदूक) यांच्यात स्पर्धा रंगली होती तर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी मुक्ता बर्वे (डबल सीट), स्मिता तांबे (कॅण्डल मार्च), सोनाली कुलकर्णी (डॉ. प्रकाश बाबा आमटे) यांना नामांकने जाहीर झाली होती.

नवोदीत चेहरा म्हणून करिष्मा कुलकर्णी (डब्बा एैसपैस), आरोह वेलणकर (रेगे), पर्ण पेठे (रमा माधव) या कलाकारांना नामांकन जाहीर झाली होती तर समीक्षकांची पसंती पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक (एक हजाराची नोट) यांची निवड करण्यात आली आहे. खलनायक भूमिकेसाठी जितेंद्र जोशी (बाजी), शरद केळकर (लय भारी), महेश मांजरेकर (रेगे) यांच्यात चुरस रंगलेली पहायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारासाठी  मकरंद अनासपुरे (बायको नं. १ ), ऋषिकेश जोशी  (पोस्टर बॉईज), वर्षा ऊसगांवकर (हु तू तू ) यांना तर सर्वोत्कृष्ट संकलक पुरस्कारासाठी इम्रान फैसल (क्लासमेट्स), दिनेश पुजारी (रेगे), अभिजीत देशपांडे (एलिझाबेथ एकादशी) यांना नामांकने होती.

सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कारासाठी मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी), मंगेश हाडवळे (टपाल), श्रीकांत बोजेवार (एक हजाराची नोट) यांना नामांकने होती तर  सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कारासाठी संतोष संक्कड (निळकंठ मास्तर), नितीन देसाई (रमा माधव), संतोष फुटाणे (लोकमान्य एक युगपुरुष) यांच्यात स्पर्धा रंगली. सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्कारासाठी अमोल गोळे (एलिझाबेथ एकादशी), प्रसाद भेंडे (मितवा), लक्ष्मण उतेकर (टपाल) यांची नावे जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक विभागात अजय – अतुल (लय भारी), निलेश मोहरीर (मितवा), अमितराज (क्लासमेट्स) यांना नामांकनं मिळाली होती. सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतसाठी माँटी शर्मा (रेगे), नरेंद्र भिडे (एलिझाबेथ एकादशी), ट्रॉय / अरिफ (क्लासमेट्स) यांना तर सर्वोत्कृष्ट गीतासाठी गुरु ठाकूर (लय भारी), परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी), गुरु ठाकूर (संदूक) यांना नामांकन मिळाली होती. सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कारासाठी अजय गोगावले (लय भारी), शंकर महादेवन (मितवा), स्वप्नील बांदोडकर (संदूक) यांची तर सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कारासाठी जान्ह्वी अरोरा (मितवा), नेहा राजपाल (कांकण), मधुरा दातार (रमा माधव) यांना नामांकन जाहीर झाली होती. सर्वोत्कृष्ट साहसदृश्यांसाठी कौशल मोसेस (लय भारी), स्टंट सिल्वा (बाजी) या दोघांना नामांकन मिळाले होते तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता / अभिनेत्री पुरस्कारासाठी प्रार्थना बेहरे (मितवा), सई ताम्हणकर  (क्लासमेट्स), पुष्कर श्रोत्री (रेगे) यांच्यात स्पर्धा रंगलेली पहायला मिळाली.

No comments:

Post a Comment