‘युथ’ चित्रपट म्हटल्यावर ‘युथफुल’ म्युझिक ही असणारच. युथ या आगामी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच अभिनेता जावेद जाफरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी युथ सिनेमाचे कलाकार-तंत्रज्ञ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत सुंदर सेतुरामन निर्मित २० मे ला प्रदर्शित होणाऱ्या युथ या सिनेमात तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील अशीवेगवेगळ्या जॉनरची चार गाणी आहेत. हा युथफुल म्युझिक नजराणा प्रेक्षकांना निश्चितंच आवडेल असा विश्वास अभिनेते जावेद जाफरी यांनी व्यक्त केला.
सिनेमातील गीतांना तरुणाईचा स्वर लाभला असून युथ चा म्युझिक नजराणाअनेक सरप्राइझेसनी भरला आहे. स्वानंद किरकिरे यांचं भारुड, जावेद जाफरी यांचं रॅपसॉंग, गायक अरमान मलिकचं लव्हसॉंग, चिन्मय हुलाळकर, जगदीश पवार व गायिका शाल्मली खोलगडे यांचं जोशपूर्ण युथ गीत अशा चार गीतांचा नजराणा युथ सिनेमात आहे. ‘बेधुंद बेफिकर उनाड वारा मी माझ्या इशाऱ्यावर चाले दुनिया ही’ हे युथ गीत, ‘बंद कर राग डोक्यात गेली आग' हे रॅपसॉंग‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’ हे भारुड ‘जे होते मला होते का तुला’ हे लव्हसॉंग अशा वेगवेगळ्या जॉनरच्या गीतांचा आस्वाद या चित्रपटातून घ्यायला मिळणार आहे. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे.
युथ सिनेमातील सहाही तरुण व्यक्तिरेखा अतिशय सकारात्मक असून ‘कुछ कर दिखाना है’ हा त्यांचा निश्चय काय बदल घडवणार याची रोमांचकारी कथा युथसिनेमात मांडण्यात आली आहे. युथ सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुडाळकर याचं असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाचे संवादकथा-पटकथा विशाल चव्हाण व युग यांचे आहेत. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवजी सकपाळ यांचं आहे. वेशभूषा भाग्यश्री, मिहीर, अश्विन यांची आहे. चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर तुकाराम नाडकर आहेत.
नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले व सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका ही चित्रपटात आहेत. २० मे ला युथ प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment