Tuesday, December 29, 2015

मेघन व मितीलाची अनोखी लव्हस्टोरी

 


निस्वार्थ निखळ प्रेमकथा नेहमीच सिनेमाची जान राहिल्या आहेत. कोणत्याही भाषेतील असो वा प्रांतातील प्रेमकथांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेमाचा अनवट पैलू शोधू पाहणारी कविशा प्रोडक्शनची चाहतो मी तुला ही अनोखी लव्हस्टोरी १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा एक फ्रेश चित्रपट चाहतो मी तुलाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर ह्या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रंगणार आहे.


प्रेमाला वयकाळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या मुलाची व मुलीची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटूंबीय समजून घेतात कात्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणारयाची कथा चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. भरत शहा प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे.


विशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी जगन यांच असून संवाद महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. रविंद्र लोले व मेवालाल मौर्या यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात मेघन जाधवमितीला मिरजकर यांच्यासह प्रसाद ओकश्रुती मराठेसुलेखा तळवलकरभारत गणेशपुरेविद्याधर जोशीआनंदा कारेकरया कलाकारांच्या भूमिका आहेत. १५ जानेवारीला चाहतो मी तुला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment