Friday, December 11, 2015

‘१४ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव’ २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान रंगणारInline image 1
 

‘१४ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव’ २४ ते ३१ डिसेंबर या साप्त्हात रविंद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) मध्ये आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. विनोदजी तावडे यांच्या हस्ते रविंद्र नाट्य मंदिरमध्ये २४ डिसेंबर सायं. ७ वा. होणार असून उद्घाटन सोहळ्यात आपल्या अनोख्या अभिनयाने हिंदी सिनेमाचे अभिनय दालन समृद्ध करणारी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवात सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्यजित राय लिखित दूरदर्शन मालिकेतील ५ भाग दाखविण्यात येणार आहेत.
मोहन आगाशेंना ‘अस्तु’ चित्रपटांतील भूमिकेबद्दल यंदाचा श्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दळ त्यांचं सत्कार करण्यात येणार आहे.

कोल्हापूरच्या बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे धडधडीचे कार्यकर्ते दिलीप बापट यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी १४ डिसेंबरपासून दु. २ ते सायं. ८ पर्यंत रविंद्र नाट्य मंदिरमध्ये सुरु होणार आहे.

No comments:

Post a Comment