Friday, September 11, 2015

‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा


निर्माता – आतिफ
सह-निर्माता हेमंत अणावकर
कार्यकारी निर्माता -  मंगेश जगताप
दिग्दर्शक - आर विराज
प्रस्तुतकर्ते -चॅनल यू इन्टरटेनमेंट
कथापटकथा-संवाद -  बाळ-अमोल
छाया – अंकुश बिराजदार
संकलन- निलेश गावंड
कलादिग्दर्शक- राज सांडभोर
गीतकार - मंदार चोळकर, हरिदास कड
संगीत -प्रफुल कार्लेकर
गायक - आदर्श शिंदेरेश्मा सोनावणेअवधूत गुप्तेआनंदी जोशी रोहित राऊत, प्रवीण कुंवर


कलाकार
भाऊ कदम -भाऊ दमदार
चिन्मय उदगीरकर– राज
राजेश भोसले – यश
गिरीजा जोशी– सुप्रिया
आरती सोलंकी– चटक चांदणी
संजय मोहिते– मरकूट


   -------------------------------------------------------------

वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ विनोदाचा अफलातूनअविष्कार

Inline image 2


वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ विनोदाचा अफलातून अविष्कार

मराठीतील धमाल विनोदी सिनेमांच्या यादीत आणखी एक सिनेमा सामील होण्यासाठी सज्ज झाला असून अफलातून कॉमेडी असणारा चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा.या चित्रपटातून प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे.चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीर भाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे.

दोन अवलियांची धमाल गोष्ट सांगणारा हा चित्रपट.हे दोघेजण सिनेमा काढण्यासाठी कशी धडप़ड करतात. त्यांच्या या धडपडीत काय काय घडतं. त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं.हे या सिनेमात अत्यंत रंजकपणे मांडण्यात आलं आहे.अत्यंत मनोरंजक कथा आणि त्याला भाऊ कदम सारख्या कसलेल्या अभिनेत्याची साथ यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल. चित्रपटात म्युझिकल ट्रीट ही भन्नाट आहे. मंदार चोळकर व हरिदास कड यांनी चित्रपटातील गाणी शब्दबद्ध केली असून आदर्श शिंदे, रेश्मा सोनावणे, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी रोहित राऊत व प्रवीण कुंवर यांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे.प्रफुल कार्लेकर यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.

हा चित्रपट केवळ मनोरंजन प्रधान सिनेमा आहे असं नाही तर या सिनेमाच्या माध्यमातून  संघर्ष हा कोणालाच चुकलेलाच नाही हे सांगण्याचा प्रयत्नही यात करण्यात आला आहे.अगदी प्रारंभापासून ‘मनोरंजन’ हाच उद्देश ठेवून चित्रपटाची सारी मांडणी केलीय. या चित्रपटात प्रसंगनिष्ठ विनोदाची मेजवानी भरपूर आहे. दादा कोंडकेना हा सिनेमा समर्पित करण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची आहे. सह-निर्मात्याची जबाबदारी हेमंत अणावकर तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप यांनी सांभाळली आहे.भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. येत्या ११ सप्टेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment