मराठी चित्रपटासाठी दादा कोंडके यांचे योगदान अमूल्य आहे. बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडकेंना रसिकांचेही भरभरून प्रेम मिळाले.प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगली जाण त्यांना होती. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने रौप्य्महोत्सवी यश मिळवले. आजही दादा कोंडकेंचा मोठा चाहता वर्ग आहे.रसिकांच्या पिढ्यान्-पिढ्या नंतरही दादांच्या चित्रपटाचे आकर्षण आजही कायम आहे. त्यांच्यावरच्या याच प्रेमापोटीनिर्माते अतिफ, सहनिर्माते हेमंत अणावकर आणि दिग्दर्शक आर. विराज यांनी‘वाजलाच पाहिजे–गेम की शिणेमा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘वाजलाच पाहिजे–गेम की शिणेमा’ दादा कोंडके स्टाईल चित्रपट आहे.आताच्या काळात मराठी इंडस्ट्रीत अचूक टायमिंग आणि उत्तम कॉमेडी सेन्स असणाऱ्या भाऊ कदम यांचा अभिनय हे या सिनेमाचं खास वैशिष्ट्य. या सिनेमातील गाण्यांनाही खास दादा कोंडके टच आहे. हा चित्रपट दादा कोंडकेंची आठवणरसिकांना करून देईल असा विश्वास निर्मात्या दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत,आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे-गेम की शिणेमा’ हा चित्रपट विनोदी ढंगाचा आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीरभाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे.
या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची आहे.कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप यांनी सांभाळली आहे.भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी, संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. दादा कोंडकेंना समर्पित ‘वाजलाच पाहिजे–गेम की शिणेमा’हा चित्रपट ११ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment