Thursday, July 2, 2015

'मर्डर मेस्त्री' सिनेमात विनोदवीरांची जुगलबंदीInline image 1मराठीत रहस्यमयी चित्रपट तसे फार कमीच पहायला मिळत असताना रहस्याच्या जोडीला विनोदही...ही हटके कल्पना कशी वाटते...?असाच एक धमाल विनोदाच्या सहाय्याने उत्कंठावर्धक झालेला रहस्यमयी गुंता ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी चित्रपटाद्वारा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवणारे राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

विनोदाची उत्तम जाण असलेले अनेककलाकार 'मर्डर मेस्त्रीसिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. यातल्या प्रत्येक कलाकराच्या अभिनयाची स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे. दिलीप प्रभावळकरवंदना गुप्ते या दोन मात्तबर कलाकारांसोबत हृषिकेश जोशीविकास कदमसंजय खापरेकमलाकर सातपुतेदेवेंद्र भगतक्रांती रेडकरमानसी नाईक या नव्या दमाच्या कलाकारांची फळी या चित्रपटात पाहयला मिळणार आहे. चित्रपटातील निखळ विनोद हरवत चालला आहे. या निखळ विनोदाची अनुभती रसिक-प्रेक्षकांना 'मर्डर मेस्त्रीसिनेमा देणार आहे.

‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. हे सगळेच विनोदवीर आपल्या अचूक टायमिंगने धमाल उडवून देणारे असल्यामुळे एवढी सगळी स्टारकास्ट एकाच चित्रपटात येऊन काय धमाल उडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रहस्य लपवण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या गमती-जमतीना विनोदाची जबरदस्त फोडणी देत निर्माण होणारी गूढता हे या चित्रपटाच वेगळेपण आहे.

दिग्गज कलाकार आणि कुशल तंत्रज्ञांच्या जोडीने उत्कंठता वाढवणारा सस्पेन्स कॉमेडीचा जबरदस्त तडकामर्डर मेस्त्री' मध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला'मर्डर मेस्त्रीहा सिनेमा निर्माते अब्रार नाडियादवाला यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे.अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मितमर्डर मेस्त्री’ सिनेमातलं सगळ्या विनोदवीरांच विनोदाचं धूमशान... हास्याचे मळे फुलवणारं असणार आहे.

रहस्याला विनोदी तडका देणारा ‘मर्डर मेस्त्री’ हा धमाका चित्रपट येत्या १० जुलैला प्रदर्शित होणार आहे.  

No comments:

Post a Comment