Wednesday, June 3, 2015

तरुणाईची स्पंदने रेखाटणारा ‘युथ’
मराठी सिनेमांमध्ये तरुणाईभोवती विकसित होऊ पाहणारा आशय अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे. अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडेप्रश्नांकडे तरुणाईचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. हाच दृष्टीकोन आगामी युथया मराठी सिनेमामधून पाहता येणार आहे.या सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली.

व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुतसुंदर सेतुरामन निर्मित युथया आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह,उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोनयुथसिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो. 

याप्रसंगी बोलताना निर्माता सुंदर सेतुरामन म्हणाले कीयुथहा विषय मला भावला म्हणूनच या सिनेमाच्या निर्मितीसाठी मी उत्साहाने पुढाकार घेतला. तरुणांकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन हा चित्रपट समाजाला देईल, असा मला विश्वास वाटतो.युथचे दिग्दर्शक राकेश कुडाळकर म्हणाले कीआजचा तरुण उत्साही, धाडसी तर आहेच पण तो तितकाच जबाबदार आणि मेहनतीसुद्धा आहे.आज समाजात वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न हा तरुणवर्ग करतोय, त्याला समाजातल्या इतर घटकांनीही साथ देण्याची गरज आहे. हा चित्रपट हीच गोष्ट अधोरेखित करतो.

एन चंद्रागिरीष घाणेकर या सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभवनामांकित कंपन्याच्या जाहिरातींचं दिग्दर्शनसंकलन अशी मुशाफिरी करणाऱ्या राकेश कुडाळकर यांचासिनेमा दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न आहे.

या सिनेमाचे संवाद विशाल चव्हाण व युग यांनी लिहिले आहेत. सिनेमातील गीतांनाही तरुणाईचा स्वर लाभला असून आजचे आघाडीचे गायक जावेद अली व गायिका शाल्मली खोलगडे यांनी यातील गीते गायली आहेत. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.

विक्रम गोखलेनेहा महाजनअक्षय वाघमारे,मीरा जोशीअक्षय म्हात्रेकेतकी कुलकर्णीशशांक जाधव या कलाकारांच्या भूमिकांनी सजलेल्या युथसिनेमातून आजची तरुणपिढी भोवतालच्या घटनांबद्दल किती संवेदनशीलपणे पहाते याचे चित्रण पहायला मिळणार आहे. लवकरच युथच्या चित्रीकरणाला कोल्हापूरात सुरूवात होणार आहे.

No comments:

Post a Comment