Friday, April 3, 2015

मणिपुरी तरुणीच्या भूमिकेत सारा श्रवण
'व्हॉट अबाऊट सावरकर?' चित्रपटासाठी स्वीकारलं आव्हान

भूमिकांमधील आव्हान कलाकारांना नेहमीच खुणावत असतंवास्तवात आपण जसे आहोत तसे पडद्यावर दिसता आपल्यापेक्षा अगदी वेगळं पात्र साकारायला मिळावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असतेअभिनेत्री सारा श्रवणहिची आव्हानात्मक भूमिका साकारण्याची इच्छा 'व्हॉट अबाऊट सावरकर?' या चित्रपटाने पूर्ण केली आहेया मराठमोळ्याअभिनेत्रीला कारकीर्दीच्या महत्त्वाच्या वळणावर 'व्हॉट अबाऊट सावरकर?' सारख्या मराठी चित्रपटात मणिपुरी तरुणीची भूमिका साकारण्याची संधी लाभली

रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टीअतुल परब यांची निर्मिती असलेल्या 'व्हॉट अबाऊट सावरकर?' हा सिनेमा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार मांडणाराआहेसावरकरांच्या विचारांनी प्रेरित  होऊन समाजात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या ध्येयवेडया तरुणाची कथा या चित्रपटातमांडण्यात आली आहेसावरकरांच्या विचारांनी केवळ महाराष्ट्रातीलच तरुणांना स्फूर्ती देण्याचं काम केलं नाहीतरभारताच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या विचारांनी पेटून उठलेले तरुण-तरुणी आहेतपंजाबपासून मणिपूरपर्यंत पसरलेल्यासावरकरांच्या वैचारिक महासागरातील पाईक होण्याचं भाग्य एका तरुणीला लाभलं, हेच पात्र सारा श्रवणने  'व्हॉटअबाऊट सावरकर?' चित्रपटात साकारलं आहे.  

'व्हॉट अबाऊट सावरकरमध्ये साराने सुनीती सिंग नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहेया तरुणीच्यामनावर सावरकरवादी विचारांचा पगडा आहेचित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिमान मराठेच्या वैचारिक लढ्यातती ठामपणे उभी आहेसारा म्हणते किसावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नसून ते संपूर्ण भारताचे होतेत्यांच्या विचारांचाप्रभाव अमराठी लोकांवरही होतामी साकारलेलं पात्र त्यांचंच प्रतिनिधित्व करणार आहेतिरंग्यामुळे माझी आणिचित्रपटाच्या नायकाची भेट होतेत्यानंतर आम्ही एकजुटीने काम करतो. 'व्हॉट अबाऊट सावरकर?' मध्ये काम करण्याचाअनुभव अविस्मरणीय तर होताचपण बरंच काही शिकवणारा होतानवीन कलाकारांच्या जोडीला मराठीतीलदिग्गजांसोबत काम करताना जो अनुभव गाठीशी आला तो भविष्यात नक्कीच कामी येईल.

१७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात शरद पोंक्षेविवेक लागूअविनाश नारकरअतुल तोडणकर,सारा श्रवण,श्रीकांत भिडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेतनिलेश मालप ,गगन बाया आणि नीती सिंग या चित्रपटाचेसहनिर्माते असून नागेश पुजारी कार्यकारी निर्माते आहेतकिंदर सिंग यांनी साहसदृश्यांचे दिग्दर्शन केलं असून नृत्यदिग्दर्शन श्रीकांत अहिरे यांचे आहे.रंगभूषा किरण सावंत यांनी केली आहेतर वेशभूषा रीना मदाने यांची आहे. 'व्हॉटअबाऊट सावरकर?' मध्ये एका ध्येयवेडया तरुणाचा प्रवास रेखाटतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्याचाआढावा आणि विचारांचा मागोवा घेण्यात आला आहे

No comments:

Post a Comment