Friday, April 3, 2015

आता बच्चेकंपनी म्हणणार 'आटली बाटली फुटली'





'आटली बाटली फुटली' याचा खरा अर्थ आतली बातमी फुटली. लहान मुलांच्या बोबड्या शब्दातून खेळता खेळता तयार झालेला हा शब्दप्रयोग आपण सर्वांनीच लहानपणी उच्चारलेला आहे.सध्याच्या धावपळीच्या युगात स्वकेंद्री वृत्तीवाढताना दिसत आहेइतरांचा विचार करण्याचीत्यांना मदत करण्याची  वृत्ती कमी होताना दिसत आहेलहानपणीमुलांच्या मनावर जे बिंबवल जातं तशीच त्यांची जडणघडण मोठेपणी होत असतेत्यामुळे लहान वयातच त्यांच्यातसहकार्याची भावना रुजवण्याच्या उद्देशाने निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी 'आटली बाटली फुटलीया मराठी चित्रपटाचीनिर्मिती केली आहेछोट्या दोस्तांचा हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे.  

रनिंग रिल प्रोडक्शन यांच्या विद्यमाने 'आटली बाटली फुटलीया चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहेलहान मुलांचेभावविश्व या चित्रपटातून उलगडणार आहेटीव्हीइंटरनेटच्या जंजाळात बच्चेकंपनी निखळ मैत्रीचा आनंद हरवून बसलीआहेतमैत्रीचे बंध त्यातला निखळ आनंद या चित्रपटातून लहानग्यांना अनुभवता येईल

लहान  मुलांसाठी हा चित्रपट नक्कीच मोलाचा ठरेल असा विश्वास निर्मात्या सुप्रिया चव्हाण यांनी व्यक्त केलाअमोलपाडावे दिग्दर्शित 'आटली बाटली फुटलीया चित्रपटात नवोदित बालकलाकारांचा सहज-सुंदर अभिनय पाहतायेईलयात शरयू  सोनावणेविराज  राणेआदित्य कावळेअनय पाटीलश्रेयाली वहानेपूर्वा शहाजीवन करळकर,विभव बोरकरसमिहा सबनीस यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेतया चित्रपटाची कथा  विक्रम चव्हाण यांनीलिहिली असून पटकथालेखन अमोल पाडावे यांनी केलं आहेगीतरचना जन्मेजय पाटीलस्वप्निल जाधव यांची तरछायांकन अनिकेत केयांनी केलं आहेअवधूत गुप्तेस्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील 'आटली बाटली फुटली', 'सांगआईया सारखी धमाल गाणी हे या चित्रपटाचं वैशिष्टय ठरणार आहे

मनोरंजनातून मूल्यांचा पाठ देणारा धमाल विनोदी तितकाच संवेदनशील चित्रपट लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाचभावेल असा आहे.

No comments:

Post a Comment