Tuesday, June 17, 2014

Star Pravah World Television Premiere of Mangalashtak Once Moreस्टार  प्रवाहवर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर
२२जून २०१४ रोजी संध्याकाळी ७ वाजता
मुंबई, १६ जून २०१४:पाऊस आणि प्रेम यांच एक अतूट नाते आहे. पावसाच्या सरीबरोबर आपल्या प्रेमाच्या आठवणीदेखील फेर धरू लागतात. या पावसाळी रविवारी, प्रेमाच्या आठवणीत चिंब भिजवण्यासाठी, २०१३ वर्षातील समीक्षकांनी आणि रसिकांनी गौरविलेला, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाने नटलेलासुपरहिट चित्रपटडेलिका प्रस्तुतमंगलाष्टक वन्स मोअरपॉवर्ड बाय वोलिनी, स्टार  प्रवाहच्या  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २२जून २०१४ रोजी संध्याकाळी ७ वाजता याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर प्रसारित होणार आहे. 
मंगलाष्टक वन्स मोअर ही गोष्ट आहे सत्यजित (स्वप्नील जोशी)  आणि आरती ( मुक्ता बर्वे) या जोडप्याची. उच्चशिक्षित आरती लग्नानंतर गृहिणी होणं पत्करते आणि सत्यजितमध्येच आपलं आयुष्य बघते. तर पूर्वी आरतीच्या भेटीसाठी आसुसलेल्यासत्यजितला कामाच्या ताणामुळे ऑफिसमध्ये जास्त वेळ दयावा लागतो. ऑफिस मधील कामाचा ताण आणि एकमेकांसाठी देण्यात येणारा वेळ  यांचा समन्वय न साधल्याने काही दिवसातच त्याच्या नातेसंबधात ताण- तणाव निर्माण होतात. अखेर छोट्याश्या कारणाने त्यांच्या संसाराची घडी विस्कटते. आजकाल बऱ्याच विवाहितांच्या घरातून जाणवणारी समस्या या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. नवरा बायकोच्या एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षा आणि त्यामुळे नात्यांची होणारी कोंडी याचे चित्रण या चित्रपटातून केले गेले आहे.
मंगलाष्टक वन्स मोअर चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वप्नील आणि मुक्ता यांची  ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. तर सई ताम्हणकर आणि कांदंबरी कदम महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक समीर जोशी यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रांत पदार्पण केले आहे. गुरु ठाकूर यांची अर्थपुर्ण गीते, निलेश मोहरीर यांचे श्रवणीय संगीत , संजय जाधव यांचे उत्तम छायादिग्दर्शन आणि स्वप्नील -मुक्ता या लोकप्रिय जोडीचा सहज सुंदर अभिनय असा सुंदर योग या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे.
या बरोबरच मंगलाष्टक वन्स मोअर कॉन्टेस्टच्या माध्यमातून सुपरस्टार स्वप्नील जोशीला भेटण्याची सुवर्णसंधी देखील स्टार प्रवाहआपल्या प्रेक्षकांना उपलब्ध करून देत आहे. चित्रपटाच्या प्रसारण दरम्यान काही  सोपे प्रश्न विचारले जाणार आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याऱ्या  नऊ भाग्यवान विजेत्या स्पर्धकांना सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे.पाहायला विसरू नका
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर  मंगलाष्टक वन्स मोअर
२२जून २०१४ रोजी संध्याकाळी ७ वाजता
फक्त स्टार प्रवाहवर

No comments:

Post a Comment