Saturday, June 14, 2014

'तुझी माझी लवस्टोरी' २० जूनला चित्रपटगृहात


'तुझी माझी लवस्टोरी' २० जूनला चित्रपटगृहात 

उन्हाळा संपत आलाय आणि आता सगळ्यांनाच वेध लागलेत ते पावसाचेपहिला पाऊस नेहमीच पहिल्या प्रेमाची, पहिल्या यादगार भेटीची आठवण करून देतो. मनाला आनंदही देतो आणि अस्वस्थही करतो. त्या आठवणीत भिजलेले क्षण टिपता टिपता मन कुठल्या कुठे हरवून जातं... पहिल्या पावसाची हीच रंगत अधिक देखणी करायला 'सिल्व्हर ऑटम प्रॉडक्शन्स' निर्मिती संस्थेचा 'तुझी माझी लवस्टोरी' हा नवा मराठी चित्रपट येऊ घातलाय. प्रेमकथांना रसिक प्रेक्षकांची असलेली विशेष पसंती लक्षात घेत निर्माते - दिग्दर्शक ऋषिकेश मोरे 'तुझी माझी लवस्टोरी' ही प्रेमकथा घेऊन आले असून 'खूप उशीर होण्यापूर्वी आपलं प्रेम व्यक्त करा' हे सांगण्याचा सुरेख प्रयत्न केलाय. ऐन पावसाच्या रोमॅंटिक वातावरणात २० जूनला हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. 

इंद्रनील आणि अदिती यांची अनोखी 'लवस्टोरी' सिनेमात पहाता येणार आहे. योगायोगाने अदितीच्या सहवासात आलेला इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. त्यादरम्यान त्याला अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रेम व्यक्त करण्याच्या इंद्रनीलच्या प्रयत्नांना अदिती काय आणि कसा प्रतिसाद देते, यावर 'तुझी माझी लवस्टोरी' ची कथा बेतली आहे. चित्रपटात इंद्रनीलची भूमिका गौरव घाटणेकरने साकारली असून अदितीच्या भूमिकेत श्रुती मराठेने त्याला साथ दिली आहे. चित्रपटाची कथा -पटकथा दिग्दर्शक ऋषिकेश मोरे यांनी लिहिली असून संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. ऋषिकेश मोरे यांचे लेखन आणि निर्मिती असलेल्या ‘पिकनिक’ सिनेमानंतर येत असलेला 'तुझी माझी लवस्टोरी' हा दुसरा चित्रपट आहे.  'तुझी माझी लवस्टोरीसिनेमाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शनात देखील प्रवेश केला असून निर्माता- दिग्दर्शक आणि लेखक अशी तिहेरी कामगिरी बजावली आहे

'तुझी माझी लवस्टोरी' चित्रपटाचा फ्रेश लुक आणि त्याला साजेसं युथफुल संगीत तरुणाईला नक्कीच आवडेलं असं आहे. चित्रपटाच्या प्रेममयी विषयाला साजेशी गीतरचना अश्विनी शेंडे यांनी लिहिली असून या आशयघन प्रेमगीतांना हिंदीतील ख्यातनाम संगीतकार बापी तुतूल यांनी सुमधूर संगीताची साथ दिली आहे. प्रेमाच्या विविध भावछ्टा रेखाटणाऱ्या गीतांचा यात समावेश असून सिनेमात पाच गीते आहेत. 'सुटलेत हात ही', 'मी बेह्का', 'पसरून जशी', 'तुझी माझी लवस्टोरी' या गीतांसोबत एक थीम सॉंग अशी वैविध्यपूर्ण गीते यात आहेत. ऋषिकेश कामेरकर नेहा राजपाल यांनी ती गायली आहेतप्रेमकथेला साजेसे सिनेमाचे छायाचित्रण अर्जुन सार्टे यांनी केलं असून संकलन रोहन देशपांडे यांचे तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, संकेत मोरे, कल्पना साठे, उदय लागू, नेहा बाममृणालिनी जांभळे, अशोक कुलकर्णी, श्रीकांत कामत, वरद चव्हाण, प्रशांत नेमाने या कलाकारांच्या भूमिका असलेला 'तुझी माझी लवस्टोरी' येत्या २० जूनला चित्रपटगृहात दाखल होतोय.

No comments:

Post a Comment