पल्लवी पाटील उपविजेती
कॅमेराचा
लखलखणारा प्रकाशझोत.. स्टुडियोमधील उत्कंठा ताणून धरणारा क्षण.. स्पर्धक
तरुणींनी रोखून धरलेला श्वास.. उपस्थित चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या
खिळलेल्या उत्सुक नजरा.. बहुप्रतिक्षित 'लक्स झक्कास हिरोईन'चा
किताब! गेले ५ आठवडे चुरशीची लढत देऊन एकमेकींवर मात करणाऱ्या १० स्पर्धक
तरुणींमधून ७ तरुणींची खडतर वाटचाल याकरिता चालू होती. सामन्यांप्रमाणे
सिनेवर्तुळातही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाची लॉटरी मिळवून देणाऱ्या ९
एक्स झक्कास वाहिनीवरील 'लक्स झक्कास हिरोईन' या आगळ्या-वेगळ्या टेलेंट हंटची चर्चा विशेषच गाजली. ग्लॅमर.. पॅशन.. ब्युटी.. बोल्डनेस.. हार्ड वर्क.. नशीब.. साऱ्याच बाबतीत यशस्वी बाजी मारत 'लक्स झक्कास हिरोईन'चा किताब पटकावला... प्रार्थना बेहेरे हिनं तर पल्लवी पाटील उपविजेती ठरली आहे.
'लक्स झक्कास हिरोईन' किताब आणि त्या अनुषंगाने चालून येणारी मितवा
चित्रपटातली महत्वपूर्ण भूमिका मिळाल्याने प्रार्थना बेहेरेचा आनंद
द्विगुणीत झाला आहे. मीनाक्षी सागर प्रोडक्शन या हिंदीतील प्रतिष्ठित
निर्मिती संस्थेचा आणि स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित म्ह्त्वाकांशी
चित्रपट मितवा मध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या
भूमिका असून त्याचे शुटींग सध्या गोव्यात चालू आहे. तसेच पल्लवी पाटील या
उपविजेत्या तरुणीला दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी क्लासमेट या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.
तरुणाईच्या कलागुणांना वाव देणारी 'लक्स झक्कास हिरोईन' ही
९ एक्स झक्कास संगीत वाहिनीने आयोजिलेल्या या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद
वाखाणण्याजोगा आहे. तरुणाईच्या कलागुणांसोबतच त्यांना हक्काचे व्यासपीठ
मिळवून देण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने या वाहिनीने सिद्ध केला असं म्हटलं
तर वावगं ठरणार नाही.
No comments:
Post a Comment