'लक्स झक्कास हिरोईन'च्या फर्स्ट रनरअपला दिग्दर्शक आदित्य सरपोतदार देणार चित्रपटात संधी
९ एक्स झक्कास वाहिनीवरील लक्स झक्कास हिरोईन टेलेंट
शो ने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक स्पर्धकांना मागे
टाकून अंतिम फेरीत दाखल झालेल्या यातील तरुणी अटीतटीची लढत देताहेत. हा शो
अधिकाधिक कल्पक करीत आयोजकांनी निरनिराळ्या विभागात याची मांडणी केली आहे.
मागच्या आठवड्यात दिलखेचक नृत्याच्या सादरीकरणाने प्रेक्षक आणि
परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या तरुणी या आठवड्यात आपल्या अभिनयाचा
कस दाखविणार आहे. सुप्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक आदित्य सरपोतदार व रवी
जाधव आणि आरजे शोनाली या भागाचे परीक्षण करणार असून येत्या शनिवारी २६
एप्रिलला रात्री ९.०० वा. ९ एक्स झक्कास वाहिनीवर तुम्ही याचे
प्रक्षेपण पाहू शकता.
आदित्य
सरपोतदार व रवी जाधव या सिनेसृष्टीतील अनुभवी दिग्दर्शकांचे मोलाचे
मार्गदर्शन या तरुणींना मिळणार असून त्यांच्यासाठी ही निश्चितच महत्वपूर्ण
संधी आहे. या वेळी राधा आणि रसिका या दोन्ही तरुणींचा अॅक्ट
परीक्षकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. प्रत्येकीनेच काहीतरी नवीन सादर
करण्याचा प्रयत्न केला होता. हा एलिमिनेशन राउंड असल्याने स्पर्धक तरुणीने
सादर केलेल्या अभिनयाच्या परफोर्मन्समधून २ तरुणी एलिमिनेट होणार
आहे. नृत्य, सादरीकरण, अभिनय, व्यक्तिमत्व या सर्वच कसोटीवर खरी उतरणारी
भाग्यवान स्पर्धक लक्स झक्कास हिरोईन चा किताब मिळविणार असून मिनाक्षी सागर प्रॉडक्शनच्या मितवा चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी सोबत हिरोईन म्हणून झळकणार आहे.
शनिवारी
२६ एप्रिल च्या भागाचे वेगळेपण ठरले ते म्हणजे आदित्य सरपोतदार यांनी
आपल्या आगामी चित्रपटात या टेलेंट शो मधून जिंकणाऱ्या फर्स्ट रनरअपला
भूमिका देण्याची घोषणा केली आहे. ९ एक्स झक्कास वाहिनीच्या या शो मुळे
तरुणींना मनोरंजन विश्वात प्रवेश करण्यासाठी प्रभावी माध्यम उपलब्ध झाले
आहे. कोण मारणार बाजी आणि कोणाचा प्रवास संपणार हे जाणण्यासाठी लक्स झक्कास हिरोईन दर शनिवारी रात्री ९. ०० वा. ९ एक्स झक्कास वाहिनीवर आवर्जून पहा.
No comments:
Post a Comment