Saturday, February 18, 2023

‘आलंय माझ्या राशीला’ अमेरिकेत


‘आलंय माझ्या राशीला' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. सगळ्या वयोगटाला हा चित्रपट चांगलाच भावतोय. राज्यातील अनेक चित्रपटगृहांतून  'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळाली आहे. पुण्यामधील सर्वच सिनेमागृहांमध्ये 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचे सगळेच खेळ हाऊसफुल्ल होत असताना आता चक्क अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळातर्फे ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे. 
या बाबत  बोलताना  चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर सांगतात की, हा ‘चित्रपट सर्वांना आवडतोय ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे’. दुसऱ्या आठवडयातही चित्रपटाची चांगली घोडदौड सुरु असून प्रेक्षकांच्या आग्रहाखातर अनेक ठिकाणचे शो वाढविण्यात आले आहेत. परदेशातही या चित्रपटाची खास मागणी असून अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळाने  या  चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवले असून  परदेशातल्या मराठी जणांना  या चित्रपटाचा आनंद  घेता येणार आहे. ही  आमच्यासाठी सुखावह बाब आहे.  
या चित्रपटात प्रत्येक राशीची एक वेगळी मज्जा मांडण्यात आली आहे. चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असलेला ‘आलंय माझ्या राशीला' प्रेक्षकांचा 'आनंद' द्विगुणितकरण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेशदेसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, सिद्धार्थ खिरीड प्रणव पिंपळकर आणि आनंद पिंपळकर यांच्याभूमिका आहेत. आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित आणि फिल्मास्त्र स्टुडिओप्रस्तुत ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे.



No comments:

Post a Comment