Wednesday, November 9, 2022

ग्रँड मराठा फाउंडेशनमुळे उजळली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी

मुंबई, 2 नोव्हेंबर 2022 : महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी काम करणाऱ्या ग्रँड मराठा फाउंडेशन या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कपडे, शालेय साहित्य, गोधड्या, चादरी, खेळणी, दप्तरे आणि फराळवाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कर्जत, पनवेल, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडामध्ये या आठवडाभर हा उपक्रम सुरू होता. शेतकऱ्यांच्या विधवा व त्यांचे कुटुंबीय, आदिवासी समाज, वंचित मुले हे या उपक्रमाचे लाभार्थी होते.
ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक श्री. रोहित शेलटकर आणि ग्रँड मराठा फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती माधवी शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना ग्रँड मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. रोहित शेलटकर म्हणाले, "वंचितांना चांगल्या सुविधा व सर्वांगीण विकास उपलब्ध करून देत त्यांची प्रगती करण्यासाठी ग्रँड मराठा फाउंडेशन काम करते. अनेक कुटुंबांची दिवाळी प्रकाशमय करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणि चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मदत करता आल्याचा आम्हाला आनंद आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे राहणीमान अधिक चांगले व्हावे यासाठी त्यांचे सबलीकरण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू."
लोकांना मदत करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात ग्रँड मराठा फाउंडेशन कायम आघाडीवर असते. कर्ज व गरीबीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. या दिवाळीमध्ये वंचित मुले, शेतकऱ्यांच्या विधवा व आदिवासी समाजाला मदत करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट होते, जे या मदतीचा उपयोग करून हा सण आनंदाने व्यतीत करतील.
ग्रँड मराठा फाउंडेशनबद्दल :
ग्रँड मराठा फाउंडेशन शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक मदत उपलब्ध करून देते. यात शेतमालाला योग्य किंमत मिळण्यापासून ते उत्तम वितरण, आधुनिक तंत्र यांचा समावेश आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना अधिक चांगली उपजीविका प्राप्त करून देऊन आणि कर्ज व गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सबलीकरण करता येईल. विदर्भावर विशेष भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्तम मुलांना शिक्षण देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि कृषी व ग्रामीण भागांमध्ये संलग्न व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. शाळांना संगणकाची देणगी देऊन त्यांनी ई-अध्ययनाचा परिचय करून दिला आहे आणि चालना दिली आहे. शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अधिक चांगले उपजीविकेचे मार्ग उपलब्ध करून देत सर्वांगीण उपाययोजना प्रदान करण्याचे आणि या माध्यमातून त्यांना कर्ज व गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे ग्रँड मराठा फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर येथे ही फाउंडेशन सक्रिय आहे आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास या संस्थेतर्फे करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या कामकाजातील अडथळे कमी होऊन अधिक चांगले जीवन जगण्यासाठी त्यांचे सबलीकरण करणे हे उद्दिष्ट आहे.
लिंक : http://grandmaratha.org/

No comments:

Post a Comment