Sunday, December 6, 2020

परिसंवादातून उलगडणार रंगभूमीच्या स्थित्यंतराचा आढावा

विनय आपटे प्रतिष्ठान आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघच्या वतीने परिसंवादाचे आयोजन

 

सध्या नाट्यसृष्टी संक्रमणातून जात आहे.  नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातली नाट्यगृहे सुरु  करण्याचा निर्णय मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला असला तरीही अजून नाटकांचे प्रयोग सुरु झाले नाहीत ते करण्याचे प्रयत्न अजून सुरू आहेत.

 

कशी असेल कोव्हिड नंतरची मराठी रंगभूमी?

काय असेल कलाकारांसाठी  न्यू नॉर्मल

काय असेल निर्मात्यांचे आर्थिक गणित

प्रेक्षक किती येतील

 

.... या आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि डिसेंबर रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहेविनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात  विजय केंकरेवंदना गुप्तेश्रीरंग गोडबोलेसुनील बर्वेप्राजक्त देशमुखअभिजित झुंजारराव सहभागी होणार आहेत.

   

सोमवार  डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजतामादाम कामा हॉलसावरकर स्मारकदादर येथे हा परिसंवाद होफक्त निमंत्रितांसाठी असणार्‍या या कार्यक्रमाचे FB live आपण vinay apte pratishthan  या FB पेज वर पाहू शकता.


No comments:

Post a Comment