Thursday, July 16, 2020

‘What’s up लग्न’ ‘अॅमेझॉन प्राइम’वरही हिट


सोशल मिडीयाच्या जगात रममाण असलेल्या आजच्या तरुण जोडप्यांना अतिशय मार्मिक संदेश देण्यात यशस्वी ठरलेला  ‘What’s up लग्न हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वरही हिट ठरतोय. अल्पावधीतच जगभरातून ६ लाखाहून अधिक व्ह्यूज या चित्रपटाने मिळवले आहेत. आजच्या तरुणाईची मानसिकतालग्न संस्काराविषयीचे मतत्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न ‘What’s up लग्न चित्रपटातून केला असूनप्रेक्षकांना तो खूपच भावत आहे. अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

वैभव तत्ववादीप्रार्थना बेहरेविक्रम गोखलेवंदना गुप्तेविद्याधर जोशीस्नेहा रायकरअश्विनी कुलकर्णी,  विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वेसविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. फिनक्राफ्ट मीडिया अँड एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे असून प्रस्तुती ‘व्हिडीओ पॅलेस’ यांची आहे. 

No comments:

Post a Comment