· गाइडमध्ये वर्क फ्रॉम होम करताना बसण्याची स्थिती कशी असावी हे सांगणाऱ्या टिप्सचा समावेश
मुंबई, 15 एप्रिल 2020 – भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड असलेल्या गोदरेज इंटेरियोने आज एका खास गाइडचे अनावरण केले असून त्यात घरातून ऑफिसचे काम करताना आदर्श बैठी स्थिती कशी असावी याच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. या गाइडमध्ये आधुनिक होम- ऑफिस सेटअपमध्ये येणारी आव्हाने व त्यावरच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत.
कोव्हिड- 19 मुळे संपूर्ण भारतीय व्यावसायिक कर्मचारी वर्गाला घरात राहून काम करावे लागत आहे. अशाप्रकारच्या टेलिकम्युटिंग माध्यमाचा परिचय नसल्यामुळे तुमच्या घरात कदाचित योग्य प्रकारचे वर्क डेस्क नसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या तडजोडपूर्ण स्थितीत बराच काळ काम करत राहिल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लॅपटॉपवर काम करतानाची स्थिती योग्य नसेल, तर त्यामुळे सांध्यांची दुखणी उदा. मान, पाठ, खांदे अशा व इतर अवयवांची दुखणी उद्भवू शकतात. म्हणूनच घरून काम करतानाच्या स्थितीकडे पुरेसे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
हे गाइड व्यावसायिकांना सहजपणे आणि अनावश्यक ताण व दुखापती टाळून त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी मदत करणारे आहे. घरातून काम करतानाची जागा योग्य असेल, तर चुकीच्या पद्धतीने बसण्यास आपोआप प्रतिबंध होईल.
गोदरेज इंटेरियोचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी अनिल माथुर म्हणाले, ‘कामासाठी ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निष्क्रिय स्वरुप, घरातून काम करण्यासाठी दिला जाणारा कित्येक तासांचा वेळ यांचा आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. नेहमीच्या कामाच्या डेस्कपेक्षा वेगळ्या ठिकाणाहून काम करण्याची संकल्पना सोपी वाटते, मात्र त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. काम करतानाच्या स्थितीबाबत जागरूक राहाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आरोग्य. या माहितीच्या आधारे आम्ही एक पोश्चर गाइड (स्थिती मार्गदर्शिका) तयार केली आहे, ज्यामध्ये घरातून काम करताना योग्य स्थिती किती महत्त्वाची आहे हे सांगण्यात आले आहे. नव्या सवयी तयार होताना आणि काम सुरू ठेवण्यासाठी कल्पक मार्ग तयार केले जात असताना उत्पादनक्षम व निरोगी राहाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घरातला हा वेळ तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी आणि सकारात्मक उर्जा कायम ठेवत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरा. घरी काम करतानाची स्थिती शास्त्रशुद्ध असेल, तर निवांत होण्यासाठी कामातून ब्रेक घेतल्यानंतर थकवा, स्नायूंवरचा ताण आणि स्नायूंमध्ये गोळे येण्याचे प्रकार टाळले जातील. एकसलग काम करताना तुमच्या बसण्याच्या स्थितीवर लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक आहे.’
नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘पोश्चर’ गाइडमध्ये आधुनिक कर्मचाऱ्यांसाठी पुढील टिप्स देण्यात आल्या आहेत
टेबल आणि खुर्चीवर बसून काम करताना
दिवसभर काम करताना बसण्याच्या वेगवेगळ्या स्थितीला पूरक ठरणाऱ्या टेबल- खुर्चीमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले. ज्या खुर्चीमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार आहात, तिच्यामध्ये आसन, आर्मरेस्ट, बॅकरेस्टची उंची अडजस्ट करण्याची सोय असल्यास भरपूर आराम मिळेल. त्याचप्रमाणे पाठीला योग्य आराम मिळावा म्हणून आवश्यक सोय त्यात असायला हवी.
- खुर्चीची उंची अडजस्ट करा आणि पाय जमिनीवर किंवा फुटरेस्टवर ठेवा. तुमचे गुडघे 90 अंशांत वाकवून पाठीवर येणारा अतिरिक्त ताण मोकळा करा.
- पाठ ताठ राहावी यासाठी कमरेला योग्य आधार द्या.
- एर्गोनोमिक (बसून काम करताना जास्तीत आराम मिळावा आणि अवयवांना दुखापत होऊ नये अशा) खुर्चीमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले. तिच्यामध्ये आसन, आर्मरेस्ट, बॅकरेस्टची उंची अडजस्ट करण्याची सोय असल्यास भरपूर आराम मिळेल. त्याचप्रमाणे कमरेला योग्य आधार देणे आवश्यक आहे, ज्यामुळे पाठीला आराम मिळेल.
- टेबल किंवा खुर्चीच्या आर्मरेस्टच्या मदतीने हातांनाही योग्य आधार द्या – त्यासाठी हाताचे कोपर कीबोर्डपासून 90 अंशात असायला हवे.
- जर तुमच्या खुर्चीवर बसल्यानंतर पाठीला आवश्यक आरामा मिळत नसेल, तर अधेमधे ब्रेक घ्या किंवा तुमची बसण्याची स्थिती दर 20 मिनिटांनी बदला.
उभे राहून काम करताना
कामाच्या स्थितीमध्ये बदल करण्यासाठी उभे राहून काम करणे ही एक चांगली कल्पना आहे. त्यासाठी एखाद्या कपाटाचा टेबलासारखा वापर करता येईल. तुम्ही जितक्या जास्त वेळा कामाची स्थिती बदला, तितके तुम्हाला बरे वाटेल.
उभे राहाताना
· तुमचा लॅपटॉप कठीण पार्श्वभागावर ठेवा. लॅपटॉपच्या स्क्रीनची उंची तुमच्या नजरेसमोर येईल अशा प्रकारे ठेवा.
· मान खाली करू नका किंवा पाठ झुकवू नका.
· लॅपटॉपपासून द्रवपदार्थ दूर ठेवा.
सोफा किंवा गादीवर बसून काम करताना
सोफा, गादी किंवा बीन बॅगवर बसून काम करणं नक्कीच छान वाटतं. मात्र, ते थोड्या वेळासाठीच चांगलं असतं. बसण्याच्या आदर्श स्थितीचे नियम विसरू नका.
- योग्य आधार मिळावा म्हणून पाठीच्या मागे उशी ठेवा.
- लॅपटॉप स्थिर राहावा यासाठी त्यामागे स्टँड किंवा कार्डबोर्ड ठेवा.
- लॅपटॉपच्या स्क्रीनची उंची तुमच्या डोळ्यांच्या पातळीसमोर येईल अशा प्रकारे अडजस्ट करा.
- काम करताना वाकणे किंवा मान खाली करणे टाळा.
लॅपटॉप सुरक्षितपणे वापरा
घरी लॅपटॉपवर काम करताना आरामात बसता येईल अशा जागेची निवड करणे स्वाभाविक आहे. मात्र, तुम्ही बराच वेळ काम करणार असाल, तर योग्य स्थिती राखणे महत्त्वाचे ठरते. लॅपटॉप स्क्रीनची उंची तुमच्या डोळ्यांच्या पातळीसमोर यावी यासाठी लॅपटॉप स्टँड वापरा. त्याशिवाय टायपिंग करताना स्क्रीन हाताच्या अंतरावर राहावा यासाठी वायरलेस माउस, कीबोर्ड वापरणे नक्कीच उपयोगी ठरेल.
हालचाल करा
वर्क फ्रॉम होम म्हणजे बैठ्या जीवनशैलीला अजून प्रोत्साहन! कॉन्फरन्स रूममध्ये जाण्याची किंवा जेवणानंतर शतपावली करण्याची वेळच येत नाही. घरातून काम करताना अधेमधे ब्रेक घेऊन इकडेतिकडे फिरत हालचाल करा. फोनवर बोलत असताना चालत राहा. ऑफिसमध्ये असल्याप्रमाणे इतरांबरोबर मिसळत राहा. छोट्या ब्रेकमुळेसुद्धा तुमच्या उत्पादनक्षमतेला चांगली चालना मिळते आणि दिवसभर बसून राहाणं आपोआप टाळलं जातं.
दररोज व्यायाम करा
जिमला जाता येत नसलं, तरी रोज व्यायाम करा. स्नायूंना ताण द्या आणि स्वतःला कायम फिट व निरोगी ठेवा. दिवसभर बसून राहाणं टाळण्यासाठी सतत हालचाल करत राहाणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला मशिनशिवाय बरेचसे व्यायाम आणि स्ट्रेचिंग करता येईल. दिवसभर उत्साही वाटण्यासाठी रोज सकाळी क्रंचेस, पुश- अप्स, स्क्वॅट्स, लेग लिफ्ट्स करता येतील. यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फिट राहाता येईल, शिवाय मानसिक एकाग्रता सुधारून तुमची उत्पादनक्षमता वाढेल.
शोल्डर रेझेस
मानेवरील ताण मोकळा करण्यासाठी पुढील व्यायाम सर्वोत्तम आहे.
पायरी 1 – खांदे कानापर्यंत उंचवा.
पायरी 2 – दहा सेकंद हीच स्थिती कायम ठेवा आणि मग सोडा.
पायरी 3 – अजून जास्त स्ट्रेचिंग हवे असल्यास एका वेळेस एका खांद्याचा व्यायाम करा आणि त्यानंतर दोन्ही खांद्यांचा एक आड एक पाच वेळा व्यायाम करा.
लेग प्लँक्स
पायरी 1 – खुर्चीच्या टोकाला बसा आणि पाय जमिनीवर तर गुडघे वाकलेल्या स्थितीत ठेवा.
पायरी 2 – हळुवारपणे तुमचा उजवा पाय सरळ आणि जमिनीला समांतर होईपर्यंत पुढे आणा.
प्रत्येक पायासाठी पाच मिनिटे हा व्यायाम कराय
पायरी 3 – ही स्थिती दहा सेकंद कायम ठेवा आणि नंतर दुसऱ्या पायावर करा.
चेयर डिप
पायरी 1 – बसलेल्या स्थितीत तुमचे दोन्ही हात आर्मरेस्टव/सोफा/बेडवर ठएवा आणि तुमचा पार्श्वभाग आसनाच्या पुढच्या बाजूस आणा.
पायरी 2 – हात हळू सरळ करा आणि शरीर खुर्चीच्या वर उचला. ही स्थिती दहा सेकंद कायम ठेवा. रिलॅक्स व्हा आणि पहिल्या स्थितीत परत या.
It was an amazing blog on the orient publication and thanks for sharing a wonderful blog with us
ReplyDeleteCherrypick offers a wide range of imported luxurios Relaxing chair in a variety of colours, styles, and fashions.