Saturday, February 8, 2020

‘भयभीत’ चित्रपटाचे दिमाखदार संगीत अनावरणआयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणाऱ्या गूढाचा भीतीदायक अनुभव देणारा ‘भयभीत’ हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर व संगीत अनावरण सोहळा नुकताच बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांच्या हस्ते संपन्न झाला. चित्रपटातील कलाकारतंत्रज्ञ व मान्यवर मंडळी यावेळी उपस्थितीत होती. अॅक्च्युल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ यांची प्रस्तुती असलेल्या भयभीत चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक नायडू यांचे असून निर्मिती शंकर रोहरा ,दिपक नारायणी यांची आहे
केवळ शक्यतांचा अंदाज बांधून शोधाचा मागोवा घेणारा ‘भयभीत’ चा ट्रेलर काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. धक्कादायक वळण घेत हा चित्रपट प्रत्येकाला ‘सरप्राईज’ करेल असा विश्वास अभिनेता सुबोध भावे, दिग्दर्शक व निर्मात्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. अब्बास-मस्तान यांनी चित्रपटाच्या ट्रेलर व संगीताचे कौतुक करताना चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
सुबोध भावेपूर्वा गोखलेगिरीजा जोशीमधू शर्मामृणाल जाधवयतीन कार्यकर आदि कलावंत ‘भयभीत’ चित्रपटात आहेत. अविनाश रोहरापवन कटारियासमीर आफताबप्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन एकनाथ राणे तर साऊंड डिझायनर सतीश पुजारी आहेत. गीतकार मंदार चोळकर असून संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी नकाश अझीज यांनी सांभाळली आहे. कथा एस.ए तर पटकथा आणि संवाद दिनेश जगताप यांचे आहेत. छायांकनाची जबाबदारी वासू यांनी सांभाळली असून नृत्यदिग्दर्शन किरण गिरी यांचे आहे. अॅक्शन शकिल शैकिल यांची आहे. कार्यकारी निर्माता अनिल सिंग आहेत.
‘भयभीत’ येत्या २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment