Sunday, August 4, 2019

फेविक्रिल आणि पार्किन्सन डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी यांच्यातर्फे रंगोत्सव साजरामिनी कॅनव्हासच्या सहाय्याने भारताचा सर्वात मोठा नकाशा बनवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न

01 ऑगस्ट, 2019, मुंबई : पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या फेविक्रिल या कला आणि हस्तकला क्षेत्रातील आघाडीच्या ब्रॅण्डतर्फे #AllCanArt हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘फ्लुइड आर्ट टेक्निक’चा वापर करून कौशल्य आणि परिपूर्णतेच्या कल्पनांच्या पलीकडे प्रत्येकाला कलेसाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. सर्वसाधारणपणे रंग व चित्रकला यांच्याविषयी तांत्रिक माहिती नसल्याने लोक कॅनव्हासवर आपली कल्पना मांडण्यास टाळाटाळ करतात. परंतु ‘फ्लुइड आर्ट’मुळे लोकांना मुक्तपणे पेंटिंग करण्याची आणि आपली सर्जनशीलता दाखवून देण्याची संधी मिळते.

#AllCanArt चा एक भाग म्हणून, फ्लुईड आर्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रातील लोकांनी बनविलेल्या पेंटिंग्ज आणि मिनी कॅनव्हसेससह, भारताच्या सर्वात मोठ्या नकाशासाठी लिम्का रेकॉर्ड तयार करण्याचे ‘फेविक्रिल’ने लक्ष्य बाळगले आहे.

पार्किन्सन डिसिज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी (पीडीएमडीएस) या संस्थेच्या आवारात या उपक्रमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली. पीडीएमडीएस ही स्वयंसेवी संस्था पार्किन्सन या आजाराने ग्रस्त असलेल्यांना समुदाय आधारित मदत केंद्रांमध्ये ‘मल्टीडिस्प्लीनरी थेरपी’ देते. पार्किन्सनने ग्रस्त लोकांना मुक्त शारिरीक हालचाली आणि समन्वय यांची अडचण भासत असते. याही परिस्थितीत ‘फ्लुइड आर्ट टेक्निक’मुळे त्यांना कॅनव्हासवर चित्रकलेचे प्रयोग करणे सहज साधते. याचे कारण या तंत्रामध्ये कोणत्याही व्यावसायिक कौशल्याची आवश्यक नाही.

पार्कीन्सनच्या 60 हून अधिक रुग्णांनी ‘फेव्हिक्रील’च्या कार्यशाळेत भाग घेतला आणि ‘फ्लुइड आर्ट’ तंत्राचा वापर करून कॅनव्हासवर रंग भरून आपली सर्जनशीलता मुक्त  केली. शारिरीक समस्यांना सामोरे जाण्याचे आव्हान असूनही, या विशिष्ट कला प्रकारामुळे या रुग्णांना त्यांच्यात लपलेल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन मांडण्याची संधी मिळाली.

‘पार्किन्सन डिसिज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मारिया बरेटो म्हणाल्या, “आमच्या रुग्णांना #AllCanArt उपक्रमात सहभागी  होण्याची भारी संधी मिळाली. आमचा विश्वास आहे की त्यांच्या भावनिक आरोग्यासाठी आणि एकंदरीत कल्याणासाठी कला ही अतुलनीय योगदान देऊ शकते. सर्जनशील अभिव्यक्ती सक्षम केल्यामुळे रुग्णांना ही कला आरामशीर वाटली. आमच्या पार्किन्सनच्या सहाय्य गटाच्या सदस्यांनी या सत्राचा पुरेपूर आनंद लुटला.  पूर्वी कधीही न अनुभवलेली कौशल्ये शोधण्याचा हा प्रयोग खरोखरीच अवर्णनीय होता, असे त्यांनी म्हटले. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही फेविक्रिल आणि ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’चे आभारी आहोत. तसेच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’चा भाग होण्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.”

‘पिडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु भांजा म्हणाले, “#AllCanArt च्या माध्यमातून, आम्ही हे सांगू इच्छितो की आता सर्जनशील मन असणारी कोणतीही व्यक्ती आता सहजपणे पेंटिंग करू शकेल व स्वतःमधील जादू दाखवू शकेल. त्यासाठी तिला औपचारिक प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. फ्लुइड आर्ट ही मुक्तपणे उपलब्ध आहे. एखाद्या हौशी कलाकाराद्वारेदेखील तिचा सराव करून मोठ्या कलाकृती बनविता येतात. त्यामुळे प्रत्येकासाठी हा एक उत्कृष्ट कलाप्रकार बनला आहे. पीडीएमडीएसमधील रुग्णांनी या  कार्यशाळेचा अनुभव घेतल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे आणि अशा प्रकारच्या सहकार्यांचीच आम्हाला अपेक्षा आहे.”


या उपक्रमाचा दुसरा भाग मालाड येथील एमकेईएस स्कूल येथे शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट रोजी होईल. येथे 300 हून अधिक शालेय विद्यार्थी या अनोख्या कला प्रकारात त्यांचे हात रंगवून घेतील. त्याचप्रमाणे शहरभरातील कॉर्पोरेट्सकडून कॅनव्हासेस तयार करुन त्यांचे योगदान दिले जाईल.

त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी ‘सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल’मध्ये भारताचा सर्वात मोठा नकाशा तयार करण्यासाठी सर्नशील कलाकृती एकत्र ठेवल्या जातील. त्यांचे अनावरण 11 ऑगस्ट रोजी होऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल.

No comments:

Post a Comment