प्रत्येक नात्याची एक गंमत असते... त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं. कधीच एकमेकांना पाहिलेले नसताना सुद्धा लग्नानंतर जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेने रहायचं. वेळोवेळी कसोटीचे कठीण क्षण ही येतात. नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ दाखवतानाच दोन युगांमधील माणसे कशी एकमेकांशी जोडली गेली असतील. त्याच्यातील संबंध, सामायिक धागा उलगडून दाखवणारा ‘Once मोअर’ हा चित्रपट १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
‘Once मोअर’ ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांची.... नात्यातला गुंता अलगद सोडून आयुष्यात गंमत आणायची. ‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’....‘कर्म’ अधोरेखित करताना कपिल आणि अंजली या जोडप्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका रहस्याचा उलगडा झाल्यानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार? या बदलाला ते कसे सामोरे जाणार ? याची रंजक कथा ‘Once मोअर’ चित्रपटात उलगडणार आहे.
छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बिडकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर’ हा पहिला चित्रपट आहे. आजवर नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी या चित्रपटासाठी वेगळ्या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं आहे. आजोबाच्या पुरुषी रूपात त्या आपल्याला दिसणार आहेत. ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे.
रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बिडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत.
वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.शैलेंद्र बर्वे यांनी संगीताची तर सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील बांदोडकर, नकाश अजिज, हमसिका अय्यर या गायकांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. छायांकनाची संजय सिंग तर संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवदास भंडारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन चिन्नी प्रकाश, संदेश चव्हाण, श्वेता-तेजस यांचे आहे. चैत्राली डोंगरे वेशभूषा तर रंगभूषा श्रीनिवास मेनगु यांची आहे. प्रोस्थेटिक मेकअप रमेश मोहंती, कमलेश गोथिडे यांनी केला आहे. साहस दृश्याची जबाबदारी प्रशांत नाईक यांनी सांभाळली आहे.
१ ऑगस्टला ‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------------------
‘Once More’ in Theatres
There is a kind of fun in every relationship. …….in that too the relationship between a husband and wife is extremely inexplicable. Even though they have never seen each other before, after marriage they live together forever with a kind of oneness. Time and again difficult situations do arise. The pouting and sulking in their relationship, displaying an inexplicable attraction, how could people from different eras come together? Unravelling this relationship and its common thread, the movie ‘Once More’ will be in Theatres on the 1st of August.
‘Once More’is our very own story……leaving aside the tangles bring the fun into our lives. Underlining the ‘magical story in a Logical world’… ‘Karma’, the story of Kapil and Anjana is narrated in the film. After the unravelling of a mystery, what exactly will be the change in their lives? How will they face the change? This interesting story will unfold in the movie ‘Once More’.
Having acted in many serials on the small screen, actor-director Naresh Bidkar has directed his first movie ‘Once More’. Always having acted in a variety of roles, senior actress Rohini Hattangadi has enacted a very challenging role in this movie. She will be seen in a male role, that of a grandfather. Senior Shef Vishnu Manohar makes his debut as an actor with this film. He has also taken care of the production of the film.
Along with the experienced artistes Rohini Hattangadi, Purnima Talwalkar, Bharat Ganeshpure, Vishnu Manohar and Naresh Bidkar, two new faces, Ashutosh Patki and Dhanashri Dalvi make their debut in this movie.
The movie has been produced with the combined efforts of Vanshika Creation, Devasva Production, Lavande Film and Vishnu Manohar Film. The movie is written by Shweta Bidkar. Dhanashri Vinod Patil, Suhas Jagirdar, Nilesh Lavande, Vishnu Manohar and Dr.Vineet Bandiwadekar have produced the film. Abhay Thakur, Sudeep Naik, Sampada Naik and V.T.H. Entertainment are the co-producers of the film. Shailendra Barve has scored the music for the songs and the background score is by Saurabh Bhalerao. Swapneel Bandodkar, Nakash Aziz and Hamsika Iyer have sung the songs. Cinematography is by Sanjay Singh and editing is by Nilesh Gavand. Art direction is by Devdas Bhandare and choreography is by Chinni Prakash, Sandesh Chavan and Shweta Tejas. Costumes are by Chaitrali Dongre and makeup by Shriniwas Menagu. Prosthetic makeup is by Ramesh Mohanty and Kamlesh Gothide. Action and stunts are by Prashant Naik.
‘Once More’ will be released on 1st of August.
No comments:
Post a Comment