Saturday, April 13, 2019

‘संस्कृती कलादर्पण’ नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न


संस्कृती कलादर्पण चा तीन दिवसीय नाट्य महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विजय गोखले, मिलिंद गवळीगुरुदत्त लाड, कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी, स्मिता जयकर, सविता मालपेकर आदि उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यंदा नाट्यमहोत्सवाचे १९ वे वर्ष असूनयावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला.
समारोपाच्या भाषणात  बोलताना संस्कृती कलादर्पणचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे म्हणाले की, ‘मराठी नाट्यसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी संस्कृती कलादर्पण नेहमी प्रयत्नशील राहिली आहे. आम्ही ऑड डे ला नाटयमहोत्सव हाऊसफुल्ल करू शकतो तर निर्माते का करू शकणार नाही ?’असा दावा करत नटेश्वरा चरणी नाट्यसृष्टीला सुगीचे दिवस यावेत यासाठी प्रार्थना केली.   
अगदी अल्पदरामध्ये वर्षातली सर्वोत्कृष्ट नाटकं पाहण्याची पर्वणीच संस्कृती कलादर्पणमुळे मिळते. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल आभार मानत संपूर्ण नाट्यगृहात पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. उपस्थितीत आयोजक व प्रायोजकांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष-संस्थांपक चंद्रशेखर सांडवे यांनी मानले.
यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी गलतीसे मिस्टेक’, तिला काही सांगायचे आहे’ ‘दादा एक गुड न्यूज आहे’ ‘सोयरे सकळ’, गुमनाम है कोई’ या पाच नाटकांची निवड झाली होती. नाट्य महोत्सवातील पहिले नाट्य पुष्प गलतीसे मिस्टेक’ या नाटकाने गुंफले तर महोत्सवाची सांगता गुमनाम है कोई’ या नाटकाने झाली.

No comments:

Post a Comment