पणजी, २२ एप्रिल – २६ ते २८ एप्रिल २०१९ दरम्यान द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हलच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज झाले असून गोवाफेणी डिस्टिलियर्स अँड बॉटलर्सच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात येणार आहे.
हा तीन दिवसीय महोत्सव गोव्याचे आवडते खाद्यपदार्थ म्हणजेच, नारळ, काजूपासून बनवलेली विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, पेये, हस्तकलेच्या वस्तू इत्यादींवरआधारित आहे. या पदार्थांचे पारंपरिक पैलू आणि चांगले गुणधर्म तसेच त्याच्याशी संबंधित पूरक उत्पादने आणि पेये प्रदर्शित केली जाणार असून त्यामध्ये फेणी, उरक, स्थानिक पेये, लिकर्स, घरगुती वाइन यांचा समावेश असेल.
द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ मध्ये काजूरसाचे डिस्टिलिंगचे होऊन गोव्याची आवडती आणि वारशाने चालत आलेली फेणी कशी बनते याचं प्रात्यक्षिक दाखवलंजाणार आहे. अस्सल गोवन खाद्यपदार्थांशिवाय नारळ आणि काजू या तीन दिवसीय महोत्सवादरम्यान बनवले जाणारे खाद्यपदार्थ आणि पेयांचा मुख्य घटक असेल. यावेळेस कॅश्यू स्टॉम्पिंग (काजू तुडवणे) स्पर्धा घेतली जाणार आहे. त्याशिवाय कार्ल फर्नांडिस यांच्यासारखे व्यावसायिक मिक्सॉलॉजिस्ट आणि प्रसिद्ध व्यावसायिकयांच्यातर्फे आणि खाद्यपदार्थांच्या प्रात्यक्षिकासह मास्टरक्लास घएतील आणि शेफ अविनाश मार्टिन्स व टिझ मार्टिन्स अस्सल तरीही नाविन्यपूर्ण गोवन खाद्यपदार्थदाखवणार आहेत.
या महोत्सवादरम्यान प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी विविध आकर्षक उपक्रम, मनोरंजन, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून भरपूर बक्षिसे वसरप्राइजेसही ठेवण्यात आली आहेत.
प्रत्येक गोयंकराच्या मनात दडलेल्या संगीतप्रेमी रसिकाला चालना देण्यासाठी स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल एंटरटेनमेंट आयोजित करण्यात आले आहे. कालातीतकोंकणी आणि पोर्तुगीज अभिजात संगीतापासून आधुनिक इंग्रजी लॅटिन शैलीचे जॅझ व फंक रिदमसह संगीत यात ऐकायला मिळणार आहे. महोत्सवात भव्य सादरीकरणआणि आतापर्यंत कधी न पाहायला मिळालेला पूर्ण ब्रास सेक्शन अनुभवता येणार आहे.
पहिला दिवस, शुक्रवार २६ एप्रिल – या दिवशी व्हॅलेंटिनोसचे सादरीकरण आणि अस्सल पारंपरिक गोवन नृत्य पाहायला मिळणआर असून त्यानंतर १५ संगीतकार वगायकांचा समावेश असलेले टेक ५ एन्सेम्बल सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, यात हॉर्न सेक्शन, व्हायोलिन सेक्शन, फ्लुट गिटार्स, कोरस गायक आणि काहीआघाडीचे गायक असा पूर्ण सेट असेल.
दुसरा दिवस, शनीवार २७ एप्रिल – या दिवशी क्ले जार्स नावाचा गोव्यातील सर्वात लहान ड्रमरचा आणि इतर तरुण, गुणवान कलाकारांचा समावेश असलेला गोवनसंगीताचा समूह ते ‘ए युनिट’ नावाच्या नृत्य समूहासह फ्युजन सादरीकरण करणार आहेत. या सादरीकरणानंतर मंचावर विविध कथा सादर करतील. त्यांच्यासादरीकरणानंतर व्हायोलिन्स, सेलासह पूर्ण ब्रास, १४ संगीतकार व गायकांचा समावेश असलेले द कॉफी कॅट्स एन्सेम्बल आपली कला सादर करतील. अशाप्रकारचे भव्यसादरीकरण गोव्यात कदाचित पहिल्यांदाच सादर होत असावे.
दुसरा दिवस, शनीवार २७ एप्रिल – या दिवशी क्ले जार्स नावाचा गोव्यातील सर्वात लहान ड्रमरचा आणि इतर तरुण, गुणवान कलाकारांचा समावेश असलेला गोवनसंगीताचा समूह ते ‘ए युनिट’ नावाच्या नृत्य समूहासह फ्युजन सादरीकरण करणार आहेत. या सादरीकरणानंतर मंचावर विविध कथा सादर करतील. त्यांच्यासादरीकरणानंतर व्हायोलिन्स, सेलासह पूर्ण ब्रास, १४ संगीतकार व गायकांचा समावेश असलेले द कॉफी कॅट्स एन्सेम्बल आपली कला सादर करतील. अशाप्रकारचे भव्यसादरीकरण गोव्यात कदाचित पहिल्यांदाच सादर होत असावे.
तिसरा दिवस, २८ एप्रिल – यादिवशी जॅझ जंक्शन त्यांचा लॅटिन ताल आणि जॅझ फंकसह मंच उजळवणार असून त्यामध्ये गोवा व पोर्तुगालमधील पाहुण्या गायकांचासमावेश असेल.
फिनालेमध्ये गोव्याचे लेजंड म्हणून ओळखले जाणारे लोर्ना लाइव्ह सादरीकरण करत या तीन दिवसीय महोत्सावाची योग्य सांगता करतील.
महोत्सवामध्ये लाइव्ह अकॉस्टिक ब्रास बँड्सही समाविष्ट असल्यामुळे स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल २०१९ च्या दिमाखात आणखी भर पडेल.
महोत्सवात एक भव्य, डिजिटली मॅप केलेला स्क्रीन अस्सल गोवन संकल्पनांवर आधारित थ्रीडी पार्श्वभूमी दर्शवत राहाणार असून त्यामुळे सर्व प्रेक्षकांना नेत्रसुखद पर्वणीमिळेल. महोत्सवाच्या ठिकाणी एक प्रवेशद्वार आणि एक निर्गमन द्वारासह मोफत पार्किंग सुविधा ठेवण्यात आली आहे. पार्किंगसाठी जागा नसल्यास प्रेक्षकांनी परेडमैदान वापरावे असे आवाहन करण्यात आले असून ट्रॅफिक पोलिसांनी सर्व कार चालकांना आपल्या गाड्या पदपथावर न लावण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment