पणजी, १७ एप्रिल – गोवा टुरिझमने १४ एप्रिल २०१९ रोजी आयनॉक्स कोर्टयार्ड, पणजी येथे गोवा व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हल आयोजित केला होता. व्हिटेंज कारआणि बाइक्स जमवण्याची व त्यांचे जतन करण्याचा ध्यास साजरा करण्याच्या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
यादरम्यान आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये १८ व्या शतकातील काही सर्वोत्तम कार आणि बाइक्स पाहायला मिळाल्या. गोव्याच्या विविध भागांतून तसेच त्याजवळच्याराज्यांतूनही कित्येक व्हिंटेज कार्स आणि मोटरसायकल्स यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमस्थळ ४५ कार्स आणि ७० बाइक्स प्रदर्शनार्थ मांडण्यात आल्या होता. गोव्याच्या राज भवनाने जतन केलेली कॅडलॅक लिमोझिनचे १९५९ मधील मॉडेल प्रेक्षकांचे सर्वात आवडते बनले.
व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांच्या सहकार्याने आयनॉक्स कोर्टयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या २०१९ गोवा व्हिंटेज कारअँड बाइक फेस्टिव्हलचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य निवडणूक अधिकारी, श्री. कुणाल यांनी गोवा टुरिझमचे सचिव श्री. जे. अशोक कुमार यांच्यासह, उत्तरगोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर. मनेका, टुरिझमचे संचालक श्री. संजीव गडकर, इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष श्री. विवेक गोएंका, ऑटोकार मासिकाचेसल्लागार श्री. बर्सिस बांद्रावाला आणि कार्यक्रमाचे आयोजक, अशोक व्हिंटेज वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या व्हिंटेज कार्स आणि बाइक्सनी कंपाळ आणि मीरामार बीच सर्कलवरून मांडवी नदीच्या काठाने रॅली काढली आणि परत पणजीमध्ये आले व पुढे अब्बे फॅरियापुतळ्यावरून (जुने सचिवालय) यू- टर्न घेत परत आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये डिस्प्लेसाठी परतले.
आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर आणि गोव्याच्या निवडणूक आयोगाचे आयकॉन वर्मा डिमिलो यांनी गायिका मेरी जो यांच्यासह प्रेक्षकांसाठी खास फॅशन शोचे आयोजनकेले होते. त्यात कुणबी हे गोव्याचे पारंपरिक वस्त्र प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आले होते. गोव्याचा लोकप्रिय बँड क्रिमसन टाइडने धमाकेदार नृत्य सादरीकरण केले. यावेळेस खाद्यपदार्थ आणि पेयांचे स्टॉल्सही उपलब्ध होते.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मतदार जागृती, न्याय्य मतदानाबद्दल प्रचार करण्यासाठी #सेव्हदडेट आणि #गोव्होट याखास अभियानांचा प्रचार करण्यासाठी गोवा टुरिझमसह सहकार्य केले. २३ एप्रिल २०१९ रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी त्यांनी कार्यक्रमस्थळीसेल्फी पॉइंट्स आणि बॅनर्सच्या मदतीने जनजागृती केली.
या कार्यक्रमाचे आयोजन अडव्हर्टायझिंग असोसिएट्स आणि क्युरेटेड बाय अशोक व्हिंटेज वर्ल्ड, सपोर्टेड बाय व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया(व्हीसीसीएफआय) यांनी देशातील आघाडीचे वाहनउत्पादन मासिक- ऑटोकार हे मीडिया भागीदार या नात्याने विवा गोवा लाइफस्टाइल मासिक भागीदार म्हणून केलेहोते.
No comments:
Post a Comment