महिला दिनानिमित्त झी टॉकीजचं वंदन स्त्री शक्तीला !
झी टॉकीज ही वाहिनी गेली दहा वर्षे अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. उत्तमत्तोम मराठी चित्रपटांद्वारे महाराष्ट्राचे मनोरंजन करणारी ही वाहिनी, महिलादिनानिमित्त महिला प्रेक्षकांना  विशेष भेट देणार आहे . महिलांच्या आयुष्यावरील पाच विशेष चित्रपटांचा नजराणा झी टॉकीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. शुक्रवार, ८मार्च रोजी, झी टॉकीजवर, दिवसभर हे चित्रपट पाहायला मिळतील. महिला सक्षमीकरण, त्यांची समाजातील स्थिती, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशाविषयांवर आधारित चित्रपटांचा यात समावेश असेल. 'मला आई व्हायचंय', 'फॉरेनची पाटलीण', 'माहेरची साडी', 'तानी' या चित्रपटांसह 'मोकळा श्वास' हा सिनेमापाहण्याचीदेखील संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षकांचे सर्वाधिक आवडीचे, झी टॉकीज, महिला दिनी त्यांचा गौरव व आदर म्हणून, ही विशेष चित्रपटांची मानवंदनादेणार आहे.
'मोकळा श्वास' या चित्रपटात आजच्या पुढारलेल्या काळातही, 'मुलगी नकोच  , फक्त  मुलगा हवा ' ही एका कुटुंबाची मानसिकता दाखवली आहे . तीन  तीन मुली  आणि त्यांचा  तिरस्कार करणाऱ्या एका विकृत बापाची ही कथा आहे. मुलींनी या मानसिकतेविरोधात दिलेला लढा हा या चित्रपटाचा गाभा ठरतो. वडिलांच्या चुकीच्याविचारांना ठामपणे विरोध करणाऱ्या मुलीची भूमिका, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने समर्थपणे पेलली आहे. आजच्या काळातील मुलींमध्ये असलेला आत्मविश्वास, जिद्द अशा साऱ्याच पैलूंचे दर्शन या चित्रपटातून घडते. हा चित्रपट प्रत्येकानेच अवश्य पाहायला हवा असा आहे. सहकुटुंब आनंद घेता येईल असे चित्रपट, हीच झीटॉकीजची खासियत ठरते. त्या बरोबर  'जिद्दीने उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलीची कथा असलेला 'तानी', जुन्या काळात नेऊन ठेवणारा 'माहेरची साडी', प्रेमाखातर खेड्यातीलभारतीय संस्कृतीशी एकरूप होणारी परदेशी स्त्री दर्शवणारा 'फॉरेनची पाटलीण', परदेशी दाम्पत्यासाठी सरोगेट आई झालेल्या महिलेचं भावविश्व दाखवणारा 'मला आईव्हायचंय' या चित्रपटांचाही 'महिला दिन विशेष' यादीत समावेश आहे.
जगभरात अत्यंत उत्साहाने महिला दिन साजरा होतो त्यामुळेच  झी टॉकीज या वाहिनीने महिला प्रधान चित्रपटांच्या माध्यमातून, एक आगळी मानवंदना देत,  महिलादिन साजरा करत आहे. शुक्रवारी ८ मार्च रोजी,  दिवसभर आपल्या आवडत्या झी टॉकीजवर हे  ५ चित्रपट स्वतः महिला असाल तर स्वतः आणि पुरुष असाल तर तुमच्याआयुष्यातील महिलांना दाखवायला विसरू नका.
झी टॉकीज वाहिनी बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ' झी फैमिली पॅक' नक्की निवडा...या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायलामिळतील.
No comments:
Post a Comment