Wednesday, March 27, 2019

कोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ ची प्रेमकथा


निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण . गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. विस्तीर्ण निळेशार समुद्रकिनारे, कौलारू घरं, नारळ सुपारी, आंब्याची झाडं, सुंदर-शांत असा आसमंत आणि संस्कृती परंपरेचा विलक्षण ठेवा असणाऱ्या या मनोहारी... लोकेशन ची भुरळ निर्मात्यांना व दिग्दर्शकांना पडली नसती तर नवल ! आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे. कोकणसारखाच निसर्गाचा वरदहस्त केरळला सुद्धा लाभला आहे. कोकण आणि केरळचा एक अनोखा संगम या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे.  केरळ मधील प्रसिद्ध "विझार्ड प्रोडक्शन" या चित्रसंस्थेच्या माध्यमातून ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून मल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

चिपळूणकणकवलीकुडाळ या नयनरम्य परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून प्रणव रावराणे आणि नक्षत्र मेढेकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमयेशिवराज वाळवेकरआनंदा कारेकरअस्मिता खटखटेआबा वेलणकरसमीर खांडेकर, नयन जाधव,  विश्वजित  पालवअजित देवळे, कृतिका या कलाकारांच्या भूमिका आहेत. 
  
‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार असून या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी सांगतात किसगळ्यांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक नितांतसुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल’,असा विश्वास ते व्यक्त करतात.

चित्रपटाची निर्मिती फैझल निथीन, सिजो करीत आहेत. चित्रपटाची  संहिता  सुजित कुरूपपटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत तर संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश, संगीत विश्वजिथ यांचे तर  नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. जय कुमार नायररफिक टी. एम आणि चैत्राली डोंगरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

No comments:

Post a Comment