नुसतंच जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करून छत्रपती शिवाजी महाराजांवरील उथळ प्रेम दाखविण्यापेक्षा त्यांच्या आदर्शांची, विचारांची आणि तत्त्वांची कास धरण्याची आता गरज आली आहे. त्यांची नेमकी भूमिका मांडणारा 'छत्रपती शासन' सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित 'छत्रपती शासन' सिनेमा उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले, खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती आहे. आजच्या तरुणाईला हा चित्रपट शिवशाही बद्दल अचूक मार्गदर्शन करणारा आहे. नुकताच या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी या सिनेमाच्या निमिर्तीचा आणि दिग्दर्शनाचा प्रवास अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने मांडला. यावेळेस म्हेत्रे म्हणाले छत्रपती शासन सिनेमा म्हणजे शिव भक्तांची हिंद भक्तांसाठी अर्पण केलेली कलाकृती आहे. तरुणाईला उद्देशून ते म्हणाले हल्ली आपल्याला प्रश्न पडणे थांबले आहे. मला प्रश्न पडला, महाराजांचे आयुष्य १८३०६ दिवसांचे होते, त्यातून नेमके काय शिकायचे ? काय बोध घ्यायचा? या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच छत्रपती शासन हा चित्रपट आहे.
प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे. छत्रपती शासन सिनेमाच्या एकूण उत्पन्नाचा १० टक्के भाग हा भारतीय सेनेला देण्यात येणार आहे अशी घोषणा सह निर्माते अमर पवार यांनी या वेळेस केली.
सिनेमातील चारही गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. विशेष म्हणजे सिनेमातील प्रत्येक गाण्याचं संगीत दिग्दर्शन वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी केलं आहे. अतिशय प्रेरक आणि स्फूर्ती देणारा 'शिवबा छत्रपती'... हा पोवाडा नंदेश उमप यांनी गायला, लिहिला आणि संगीत दिग्दर्शित देखील केला आहे. गायिका जान्हवी प्रभू-अरोरा हिच्या भन्नाट आवाजातील 'मिशीवाला पाहुणा'... या आयटम सॉंगचं संगीत दिग्दर्शन रोहित नागभिडे यांचं आहे. या दोन्ही गाण्यांना डॉ विनायक पवार यांनी शब्धबद्ध केलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या गावरान ठसकेबाज आवाजातील 'वाढीव दिसताय राव;... ही धमाकेदार लावणी दीपक गायकवाड यांनी लिहिली असून सचिन अवघडे यांनी संगीतबद्ध केली आहे. या लावणीचं विशेष म्हणजे एका पुरुष कलाकाराने स्त्री वेशभूषा परिधान करत ही लावणी सादर केली आहे. सिनेमाची कथा गुंफणारं आणि रंगत वाढवणारं 'मर्द मराठ्यांचं पोर'... हे गाणं अभिजीत जाधव आणि राजन सरवदे यांनी गायन, लेखन, संगीत दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटातील अभिनेते मकरंद देशपांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आतापर्यंत अनेक सिनेमे झाले आहेत. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे. सिनेमातील माझी प्राध्यापक समर ही भूमिका महाराजांची विचारधारा मांडणारी आहे. आजच्या तरुणाईचा कान पिळण्यापेक्षा त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे जी छत्रपती शासन सिनेमा पूर्ण करतो. याच बरोबर या सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर, सायली काळे, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, विष्णू केदार, पराग शाह, अभय मिश्रा, धनश्री यादव, किरण कोरे, राहुल बेलापूरकर,सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, मिलिंद जाधव आणि जयदीप शिंदे यांच्या भूमिका आहेत. तसेच श्रीशा म्हेत्रे, रोमित भूजबळ, राजवर्धन धुसानीस, रेवा जैन ही बालकलाकार मंडळी देखील दिसणार आहेत. या सिनेमाची कथा आणि संवाद देखील खुशाल म्हेत्रे यांचेच आहेत. तर पटकथा कमलेश भांडवलकर यांची आहे. सुनील बोरकर, निशांत भागवत आणि योगेश कोळी यांनी सिनेमाचं छायांकन केलं आहे तसेच संकलन चेतन सागडे, कलादिग्दर्शन नितेश नांदगावकर, आंनद साठे, वेशभूषा प्रथमेश मांढरे, रंगभूषा पिंटो सोलापूरे, नृत्यदिग्दर्शन भक्ती नाईक यांचं आहे.
आपण शिवभक्त आहोत असं अभिमानाने मिरवितो, छातीठोकपणे सांगतो, पण आपण त्यांच्या आदर्शाप्रमाणे वागतो का ? चालतो का? बोलतो का? सगळ्यात महत्वाचे विचार करतो का? याचे उत्तर आपण स्वतःच शोधण्यासाठी हा चित्रपट ..! छत्रपती शासन..!
"Chhatrapati Shasan" ...making you aware of the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj...
Instead of showing the shallow love for Chhatrapati Shivaji Maharaj by just raising slogans of 'Jai Bhavani', 'Jai Shivaji', today there is need to uphold his ideals, thoughts and values. The film depicting his exact standpoint, 'Chhatrapati Shasan', is releasing on 15th March in entire Maharashtra. Produced by Prabodhan Films and Sawai Martand, and directed by Khushal Mhetre, film 'Chhatrapati Shasan' is a production of Utkarsh Kudale, Priyanka Kagle and Khushal Mhetre. This film will rightfully guide today's generation towards the Shivshahi (Shivaji's rule).
Recently the music inauguration ceremony was conducted. The Director of the film Khushal Mhetre described the journey of film’s production and direction in an interesting way. Mhetre said, “the film Chhatrapati Shasan is an art dedicated by the Shiv Bhakts to the Hind Bhakts.” Life of Maharaj spanned about 18306 days, what we can learn exactly from it? What wisdom we can gather? This film narrates the principles of the great warrior Chatrapati Shivaji Maharaj. Instead of worshiping symbols, images and idols or enthusiastically raising slogans of 'Jai Shivaji', this film gives an actual message of how and what Shivaji Maharaj established through his wisdom by his bravery and thoughts.” Co-Producer Amar Pawar announced that 10 percent from the total income of the film will be donated to the Indian Army in the wake of Pulwama terror attack.
All four songs in the film are of different kinds. Remarkably, music of each song in the film is directed by a different music director. A very inspiring and energetic ballad 'Shivba Chhatrapati' is sung, written and music directed by Nandesh Umap. Music of item song 'Mishiwala Pahuna' in the amazing voice of Janhavi Prabhu-Arora directed by Rohit Nagbhide. Both songs are penned down by Dr. Vinayak Pawar. Splendid Lavani 'Vadhiv Distay Rao' in the spicy rural voice of singer Urmila Dhangar, is written by Deepak Gaikwad and music composed by Sachin Avghade. Striking feature of this Lavani is that, this Lavani is performed by a male artist donning a female costume. Song which weaves around the story of the film and adds spice into it, 'Mard Marathyacha Por'... is sung, written and music directed by Abhijit Jadhav and Rajan Sarvade. Actor Makarand Deshpande while speaking about the film said that, “there have been many films on the life of Shivaji Maharaj. This is the first experience for me. My role as Professor Samar in the film presents the ideology of Shivaji Maharaj. Today’s youth needs more convincing than imposing, which the film Chhatrapati Shasan exactly does.” The cast of the film also includes actors Santosh Juvekar, Kishore Kadam, Abhijit Chavhan, Prashant Mohite, Anil Nagarkar, Sayali Kale, Prathamesh Joshi, Shreyaschandra Gaikwad, Vishnu Kedar, Parag Shah, Abhay Mishra, Dhanashree Yadav, Kiran Kore, Rahul Belapurkar, Sayali Paradkar, Ramchandra Dhumal, Milind Jadhav and Jaydeep Shinde. The film also features child actors Shrisha Mhetre, Romit Bhujabal, Rajvardhan Dhusanis and Reva Jain. The film is directed by Khushal Mhetre and he himself has written the story and dialogues, while the script is written by Kamalesh Bhandwalkar. Filming is done by Sunil Borkar, Nishant Bhagwat and Yogesh Koli, while the editing is done by Chetan Sagade, Art direction by Nitesh Nadgaonkar and Anand Sathe, costumes by Prathamesh Mandhare, set design by Pinto Kolhapure and dance direction is done by Bhakti Naik.
We proudly carry and hail the label of 'Shivbhakts' for ourselves, but the only question that arises is, do we actually live by his ideals? Follow them? Speak for them? And most importantly, think like them? To make us realize and find these answers by ourselves, the film with a narration, "Chhatrapati Shasan"..!
No comments:
Post a Comment