Saturday, January 5, 2019

‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी‘लाखात एक माझा फौजी’ म्हणत घराघरात पोहोचलेली शीतल’ म्हणजेच शिवानी बावकर आणि ‘तुला पाहते रे’ मालिकेतून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजाने अल्पावधीत लोकप्रिय झालेली सोनिया’ अर्थातच पूर्णिमा डे या दोघी लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. मिरॅकल्स फिल्म्स’ प्रस्तुत युथट्यूब या आगामी मराठी चित्रपटातून आपल्याला त्यांच्या मैत्रीचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे. १ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तरुणाईची बदलती जीवनशैलीसोशल मिडियाच्या आहारी गेल्याने हरवत चाललेला संवाद या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन सात तरुण तरुणींची कथा युथट्यूब या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद प्रभुलकर यांनी केले असून प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर संचालित मिरॅकल्स अॅक्टींग अॅकेडमीतले ३०० फ्रेश चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत. शिवानी आणिपूर्णिमा या दोघीसुद्धा मिरॅकल्स अॅक्टींग अॅकेडमीच्या विद्यार्थिनी आहेत.
मिरॅकल्स फिल्म्स प्रस्तुत आणि प्रमोद प्रभुलकर लिखितनिर्मित आणि दिग्दर्शित युथट्यूबया चित्रपटाची सहनिर्मिती मयुरपंखमिडिया आणि इन्फ्रा असोसिएटस् (संजीव पेठकरडॉ. शशांक भालकर),  अविनाश कुलकर्णीरजनी प्रभुमिराशी,डॉ.फाल्गुनी जपे,  अरुणा जपेसुधीर कुन्नुरेप्रशांत लालअहमद शेखस्वाती येवलेगिरीश नायरवैशाली कासारे,  अनिकेत कुलकर्णी,  विवेक बावधानेडॉ.संदीप कुलकर्णीसागर पुजारीवैशाली देवकरसुखद बोरकरसोनाली लोणकर, श्रीहरी पंचवाडकर आणि मेसर्स बी.एन.आर तर्फे भालचंद्र बोबडेप्रवीण नेवेगजानन रहाटे यांची आहे.
छायांकन सचिन गंडाकुश तर संकलन प्रमोद काहार यांचे आहे. कलादिग्दर्शन संजय कांदेकर यांनी केले आहे. रंगभूषा सौरभ कापडे यांची तर रंगभूषा मधुराणी प्रभुलकर यांची आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकरसायली केदारशिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज शिखा जैनआर्या आंबेकर,सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे.

No comments:

Post a Comment