Monday, November 26, 2018

प्रो व्‍हॉलीबॉल लीगतर्फे पहिल्‍या पर्वातील सहा संघांची घोषणायू स्‍पोर्टस् यू मुम्‍बा व्‍हीबी संघांचे मालक ~
मुंबई, २६ नोव्‍हेंबर २०१८: बेसलाइन वेन्‍चर्स इंडिया प्रा. लि. आणि व्‍हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (व्‍हीएफआय) यांचा उपक्रम प्रो व्‍हॉलीबॉल लीगने आज पहिल्‍या पर्वामध्‍ये सहभागी होणा-या सहा संघांची घोषणा केली.
प्रो व्‍हॉलीबॉल लीगच्‍या पहिल्‍या पर्वामध्‍ये सहभागी सहा संघ आहेत बॉन्‍होमी स्‍पोर्ट्स इव्‍हेण्‍ट मॅनेजमेंट लि.च्‍या मालकीचा अहमदाबाद डिफेन्‍डर्स,बीकॉन स्‍पोर्टसच्‍या मालकीचा कालिकत हिरोजचेन्‍नई स्‍पार्टन्‍स प्रा. लि.च्‍या मालकीचा चेन्‍नई स्‍पार्टन्‍सयू स्‍पोर्टसच्‍या मालकीचा यू मुम्‍बा व्‍हीबी,एजाइल सिक्‍युरिटीज प्रा. लि.च्‍या मालकीचा हैद्राबाद ब्‍लॅक हॉक्‍स आणि कोची ब्‍ल्‍यू स्‍पाइकर्स.
२ ते २२ फेब्रुवारीदरम्‍यान दोन टप्‍प्‍यांमध्‍ये आयोजित करण्‍यात येणा-या या लीगला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती पीव्‍ही सिंधूचे देखील पाठबळ मिळाले आहे. पीव्‍ही सिंधूच्‍या वडिलांनी या खेळामध्‍ये भारताचे प्रतिनिधीत्‍व केले होते.
या कार्यक्रमाबाबत बोलताना बेसलाइन वेन्‍चर्स प्रा. लि.चे सह-संस्‍थापक आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक तुहिन मिश्रा म्‍हणाले, ''आमचा विश्‍वास आहे की, लीग लवकरच भारतातील खेळामधील महत्‍त्‍वाची लीग असणार आहे. आम्‍ही दोन शहरांमध्‍ये लीगला सुरूवात करत आहोत आणि या शहरांमधून खेळासाठी प्रबळ पाठिंबा मिळत असून अधिक प्रमाणात चाहते देखील आहेत. आम्‍ही आमच्‍या दृष्टिकोनामध्‍ये विश्‍वास ठेवण्‍यासाठी आणि लीग व खेळाप्रती कटिबद्धता दाखवण्‍यासाठी व्‍हीएफआय, एफआयव्‍हीबी, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडिया आणि आमच्‍या सर्व संघमालकांचे आभार मानतो.''
संघांची घोषणा करताना उपस्थित असलेले व्‍हीएफआयचे सरचिटणीस रामावतार सिंग झाकर म्‍हणाले, ''प्रो व्‍हॉलीबॉल लीग खेळाच्‍या विकासामध्‍ये महत्‍त्‍वाची भूमिका बजावेल. ही लीग जगभरातील अव्‍वल आंतरराष्‍ट्रीय प्रतिभांना एकत्र आणण्‍यासोबतच भारतातील उदयोन्‍मुख प्रतिभांना या खेळातील सर्वोत्‍तम खेळाडूंकडून शिकण्‍याची संधी देखील देईल.''
एफआयव्‍हीबीचे आशिया व ओशियानासाठी संचालक लुईस अॅलेक्‍झान्‍ड्रे म्‍हणाले, ''आम्‍ही नेहमीच भारताकडे क्षमताधिष्‍ठ देश म्‍हणून पाहिले आहे. प्रो व्‍हॉलीबॉल लीग ही खेळाच्‍या विकासासाठी योग्‍य दिशेने उचललेले एक पाऊल आहे. व्‍हॉलीबॉल हा जलद व रोमांचक खेळ असण्‍यासोबतच टेलिव्हिजनसाठी सुयोग्‍य आहे. एफआयव्‍हीबीमध्‍ये आम्‍ही लीगला पूर्णपणे आमचा पाठिंबा देतो आणि पहिल्‍या पर्वासाठी त्‍यांना शुभेच्‍छा देतो.''
भारताचे दोन व्‍हॉलीबॉल ग्राऊंड म्‍हणजेच कोची (राजीव गांधी इनडोअर स्‍टेडियम) आणि चेन्‍नई (जवाहरलाल नेहरू इनडोअर स्‍टेडियम) येथे प्रो व्‍हॉलीबॉल लीगच्‍या पहिल्‍या पर्वाचे आयोजन करण्‍यात येईल. सहा संघांमध्‍ये प्रत्‍येकी १२ खेळाडूंचा समावेश असेल. या १२ खेळाडूंमध्‍ये दोन आंतरराष्‍ट्रीय खेळाडू, एक भारतीय आयकॉन खेळाडू आणि दोन भारतीय अंडर-२१ खेळाडू यांचा समावेश असेल. सहा संघ साखळी पद्धतीने एकमेकांसह एकूण १८ सामन्‍यांमध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करतील. चार अव्‍वल विजेते संघ उपांत्‍य फे-यांसाठी पात्र ठरतील.
सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाचे (एसपीएन) कन्‍टेन्‍ट, स्‍पोर्टसचे प्रमुख प्रसाना कृष्‍णन म्‍हणाले, ''आम्‍हाला प्रो व्‍हॉलीबॉल लीगच्‍या पहिल्‍या पर्वाचे अधिकृत प्रसारक असण्‍याचा आनंद होत आहे. एसपीएन भारतामध्‍ये विविध खेळांचे प्रसारण दाखवण्‍याशी कटिबद्ध आहे. म्‍हणूनच प्रो व्‍हॉलीबॉल लीग ही आमच्‍या क्रीडा पोर्टफोलिओमधील उत्‍तम भर आहे. व्‍हॉलीबॉल हा नुकतेच समापन झालेले एशियन गेम्‍स आणि २०१६ मधील रिओ ऑलिम्पिक्‍समध्‍ये अव्‍वल खेळ होता. आम्‍हाला विश्‍वास आहे कीही लीग देशात खेळ व प्रतिभांना आणखी विकसित करण्‍यामध्‍ये उत्‍प्रेरकाची भूमिका बजावेल.''
प्रो व्‍हॉलीबॉल लीगच्‍या पहिल्‍या पर्वाचे प्रसारण सोनी सिक्‍स (इंग्रजी) आणि सोनी टेन ३ (हिंदी) या चॅनेलवर सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्‍यात येईल.

No comments:

Post a Comment