पणजी, १८ नोव्हेंबर – टाटा कॅन्सर रिसर्च मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाने आयोजितकेलेल्या मांडवी नदीवरील सँटा मोनिका येथील खास क्रुझचा आनंद लुटला.
कर्करोग झालेल्या व त्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार घेणारी २८ मुले गुरुवारी आपल्या पालकांसह मडगाव येथे तीन दिवसीय सहलीसाठी दाखल झाली.
सुट्टीचा एक भाग म्हणून त्यांनी देवळे, चर्च, समुद्रकिनारे यांना भेट दिली आणि मांडवी नदीतील बोट क्रुझचा आनंद घेतला.
केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या खास विनंतीवरून जीटीडीसीने या क्रुझचे आयोजन केले होते.
जीटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि पीआरओ दीपक नार्वेकर यांनी मुले व त्यांच्या पालकांचे सँटा मोनिकावर स्वागत केले. केंद्रीय मंत्री, ओएसडी श्री. सुरज नाईक, जीटीडीसीचे सहाय्यक व्यवस्थापक – क्रुझएस, श्री. सुरेंद्र सावंत, जीटीडीसीच्या अधिकारी श्रीमती मनिषा शिरोडा आणि श्री. निलेश नाईक देसाई यांनी याप्रसंगी उपस्थित राहूनसँटा मोनिकावरील उपक्रमांचे समन्वय केले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्मचारी आणि स्वयंसेवकही यावेळेस हजर होते.
श्रीमती स्वाती म्हात्रे, ज्यु. पीआरओ आणि श्री. संतोष शेरवडे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पब्लिक रिलेशन्स टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे इतर अधिकारीहीयावेळेस उपस्थित होते.
मुलांसाठी जीटीडीसीने सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.
जीटीडीसीचे अध्यश्र श्री. दयानंद सोपटे यांनी ही आपला पूर्ण पाठिंबा देत मुलांना आरामदायी आणि आनंदी वास्तव्याचा अनुभव घेता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले.
No comments:
Post a Comment