Tuesday, August 7, 2018

‘ट्रकभर स्वप्न’ सिनेमाद्वारे मुकेश ऋषी मराठीत



हिंदी सिनेसृष्टीतील आजच्या काळातील भारदस्त अभिनेत्यांचा विषय येताच मुकेश ऋषी यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.उंचधिप्पाडभारदस्त व्यक्तिमत्व आणि पहाडी आवाज लाभलेल्या मुकेश यांनी आजवर कधी खलनायकतर कधी पोलिस इन्स्पेक्टर… कधी गँगस्टरतर कधी अतिरेकी… अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘सरफरोश’, ‘घातक’, ‘घायल’, ‘कोई मिल गया’ अशा एका पेक्षा एक हिट झालेल्या सिनेमांमधील मुकेश यांच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या आहेतमुकेश यांची पावलं आता मराठीच्या दिशेनं वळली आहेत. ट्रकभर स्वप्न या बहुचर्चित सिनेमात मुकेश यांनी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

ट्रकभर स्वप्न हा सिनेमा एका सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वप्नांचा प्रवास सादर करणारा सिनेमा आहे.मुकेश यांनी आजवर तेलुगूमल्याळमपंजाबीतमिळ अशा विविध प्रादेषिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला आहेमराठीत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असल्याचं सांगत आपल्या व्यक्तिरेखेबाबत मुकेश म्हणाले कीट्रकभर स्वप्नची अॉफर खरं तर मी यातील व्यक्तिरेखेच्या प्रेमाखातर स्वीकारलीआजवर मी विविध भाषांच्या सिनेमांमध्ये नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेतपण या सिनेमातील व्यक्तिरेखा खूप वेगळी आहेहा लोकांना पैसे देतोपण त्या बदल्यात अपेक्षाही करतोया निमित्ताने मराठी भाषेचा स्वाद चाखता आला.

ट्रकभर स्वप्नमधील व्यक्तिरेखेप्रमाणेच मुकेश या सिनेमाचे दिग्दर्शक आणि पूर्ण टिमच्याही प्रेमात आहेतते म्हणाले कीसिनेमाचे दिग्दर्शक प्रमोद पवार हे मराठीतील नामवंत अभिनेते असल्याचं जेव्हा मला समजलंतेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर वाढला.अतिशय खेळकर वातावरणात या सिनेमाचं चित्रीकरण कधी पूर्ण झालं ते समजलंच नाही.


ट्रकभर स्वप्नचं दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केलं असून पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेतमुकेश यांच्याखेरीज मकरंद देशपांडेक्रांती रेडकरमुकेश ऋषीमनोज जोशी स्मिता तांबेआदिती पोहनकर आदी कलाकारांच्याही ट्रकभर स्वप्नमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 24 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ट्रकभर स्वप्नं या सिनेमाची प्रस्तुती आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा.लि व आदित्य चित्र प्रालि यांनी केली आहेमीना चंद्रकांत देसाईनयना देसाई या ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेतसंजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मिती सल्लागार आहेत.

No comments:

Post a Comment