मन सैरभैर झालं...
नाव आठवंना झालं...
ध्यान कुठं लागंना...
काय झालं कळंना...
अशीच थोडीशी गोंधळलेली.. थोडीशी बावरलेली... अवस्था प्रत्येक प्रेमवीरांची होत असते. प्रेमात पडलेल्या अशाच प्रेमवीरांची मानसिकता नेमकी हेरत श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनद्वारा, निर्माते पंकज गुप्ता ‘काय झालं कळंना’ हा फ्रेश रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या२० जुलै ला ‘काय झालं कळंना’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे; तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.
‘काय झालं कळंना’ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे तर अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस,कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे आदी कलाकारांच्या ही मुख्य भूमिका आपल्याला यात पहायला मिळतील.
‘काय झालं कळंना’ चित्रपटाची कथा सुचिता शब्बीर यांची असून पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे यांचे आहेत. चित्रपटाची गीते माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, उर्मिला धनगर,सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे हे गायक यातील गीते स्वरबद्ध करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. ‘काय झालं कळंना’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.
‘काय झालं कळंना’ २० जुलै ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
No comments:
Post a Comment